लोटे आैद्योगिक वसाहतीतील केन कंपनीला भीषण आग; कोट्यावधींची हानी

खेड : पोलीसनामा आॅनलाइन

खेड तालुक्यातील लोटे परशुराम आैद्योगिक वसाहतीतील केन केमिकल प्रा. लि. या कंपनीला आज (शनिवार) भीषण आग लागली. या आगित कंपनिचे मोठे नुकसान झाले असून तब्बल दीड कोटींहुन अधिक वित्तहानी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
[amazon_link asins=’B01N0WVC16,B071D4MP9T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bb4c175a-b37d-11e8-8b11-7d4afc51d2c5′]

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी कंपनीची उत्पादन प्रक्रिया सरु होती. अकरा वाजण्याच्या सुमारास माल साठवून ठेवण्यात येणाऱ्या गोडाऊनच्या चाैथ्या मजल्यावरील एका ड्रमला आग लागली. ड्रमला लागलेली आग किरकोळ होती. ती अंदाजे शाॅर्टसर्किट झाल्याने लागली असावी असा अंदाज आहे. अग्निशमन यंत्राच्या मदतिने ती आग विझवण्याचे काम सुरु होते. मात्र, यंत्रणा आगिपर्यंत पोहचण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे कंपनितील कर्मचाऱ्याने जवळच असलेल्या एमआयडीसीच्या अग्निशमन दलाला जाऊन आगी बाबत माहिती दिली.
[amazon_link asins=’B07417987C,B076H74F8N’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6b21369e-b37e-11e8-a1cd-39a673a5df16′]

एमआयडीसी अग्निशमन दल घटनास्थळी पोहचेपर्यंत आगीने राैद्ररुप धारन केले होते. आग कंपनित सर्वत्र पसरली होती. कंपनीतील तयार माल, (ड्रम, बॅग्ज), छतावरील पत्रे, पाईप तसेच ईतर साहित्य, विक्रिसाठी तयार करण्यात आलेला माल पूर्णपणे जळाला. कंपनीचा संपूर्ण प्लँट बेचिराख झाला.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी