पुण्याच्या भोसरीत लांडगे सभागृहासमोर सराईत गुन्हेगारावर गोळीबार

पुणे (भोसरी) : पोलीसनामा ऑनलाईन – भोसरीमध्ये सराईत गुन्हेगारावर एका सराईत गुन्हेगाराने गोळीबार केल्याची घटना आज (रविवार) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अंकुशराव लांडगे सभागृहाच्या पाठीमागे घडली आहे. गोळीबार झालेल्या सराईत गुन्हेगाराने भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेत घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरु केले आहे.

रवी जगदाळे असे सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याने गोळीबार झाल्याची माहिती भोसरी पोलिसांना दिली आहे. रवी जगदाळे याने आपल्यावर संजु गुप्ता उर्फ सँडी याने गोळीबार केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. या घटनेत जगदाळे जखमी झाला नसून पोलीस गुप्ताचा शोध घेत आहेत. गुप्ता आणि रवी यांच्यामध्ये भोसरीत मोबाईलला स्क्रीन गार्ड लावण्याच्या दुकानावरून वाद झाले होते. याच वादातून त्याने गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, गोळीबार झाल्याची माहिती मिळताच भोसरी पोलीस ठाण्यातील अधिकारी, गुन्हे शाखेचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आरोपी गुप्ताचा शोध पोलीस घेत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like