सराफी दुकानावरती गोळीबार करुन दरोडा; १ ठार १ गंभीर जखमी

अहमदनगर :  पोलीसनामा ऑनलाईन

जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील सराफी पेढीवर दरोडेखोरांनी गोळीबार करुन हैदोस घातला आहे. दरोडे खोरांनी केलेल्या गोळीबारात एक जण ठार झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ही घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास घडली आहे.

या गोळीबारात दुकान मालक शाम सुभाष घाडगे हे मयत झाले, असून त्यांचे बंधू गणेश सुभाष घाडगे हे गंभीर जखमी झाले आहेत.

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे लक्ष्मी ज्वेलर्स नावाच्या सराफी पेढीवर दरोडे खोरांनी दरोडा टाकला आहे. रात्री आठच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली आहे. दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुकान मालकांवर गोळीबार केला. यात शाम घाडगे जागीच मयत झाले. दरम्यान गोळीबारात जखमी झालेल्या गणेश घाडगे यांच्यावर शस्त्रक्रीया करण्यात येत असून त्यांच्या हाताला गोळी लागली आहे. गणेश यांच्यावर फडके हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रीया सुरु आहे.
[amazon_link asins=’B01F7AX9ZA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0bd91c71-a3c6-11e8-9eaa-a1788d6f9788′]
सराफी पेढीवर गोळीबार करुन दरोडा पडल्याची माहिती मिळताच नगर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गोळीबार करुन दरोडा पडल्याने संपूर्ण जिल्ह्यत खळबळ उडाली आहे. दरोडे खोरांनी सोन्या चांदीचा ऐवज मोठ्या प्रमाणावर लुटून नेल्याची प्राथमीक माहिती आहे. गुन्ह्याचा तपास नगर पोलीस करीत असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

You might also like