‘या’ भाजप खासदाराच्या कार्यालयाबाहेर ‘गोळीबार’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजप खासदारांच्या ऑफिसबाहेर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. भाजपचे खासदार हंसराज हंस यांच्या रोहिणी येथील ऑफिस बाहेर ही गोळीबाराची घटना घडली. त्यांच्या ऑफिसच्या बाहेर या गोळीबारानंतर गोंधळ उडाला.

या घटनेवर बोलताना रोहिणीचे डीसीपी एस.डी. मिश्रा यांनी सांगितले की खासदार हंसराज हंस यांच्या कार्यालयाबाहेर हवेत गोळीबार करण्यात आला. हा गोळीबार का केला याचा तपास सुरु आहे. व्यक्तीची ओळख पटली आहे.

पोलिसांनी सांगितले की व्यक्तीची ओळख करुन पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. सध्या पोलीस आरोपीची चौकशी करत आहे, ज्याने हे कळेल की त्या व्यक्तीने ऑफिस बाहेर गोळीबार का केला आणि त्यामागे काही हेतू आहे का ?

Visit : Policenama.com