कॅलिफोर्नियात ‘गिलरॉय गार्लिक’ फेस्टिवलमध्ये ‘बेछूट’ गोळीबार, १२ हून अधिक गंभीर जखमी (व्हिडिओ)

कॅलिफोर्निया : वृत्तसंस्था – कॅलिफोर्नियातील गिलरॉय गार्लिक फेस्टिवलमध्ये गर्दीवर गोळीबार करण्याची घटना रविवारी रात्री उशिरा झाली असून त्यात अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसर घेरला असून सर्वांची तपासणी सुरु केली आहे.

या घटनेत किमान १२ हून अधिक लोक जखमी झाले असून याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असले तरी अजूनपर्यंत त्याबाबत पोलिसांकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आली नाही. प्रत्यक्षदर्शीनी सांगितल्यानुसार, तेथे सैनिकांच्या गणवेशात आलेल्यांनी गर्दीवर अंधाधुर गोळीबार करण्यास सुरुवात केली. आजू बाजूच्या लोकांना अगोदर फटाके फोडले जात असल्याचे सर्वप्रथम वाटले. त्यानंतर गोळीबार होत असल्याचे समजल्यावर त्यांची एकच धावपळ उडाली. जखमींना रुग्णवाहिकेतून घेऊन जाताना दिसून आल्याचे लोकांनी सांगितले. या घटनेत किती लोक जखमी झाले आहेत, याची माहिती अद्याप पोलिसांकडून देण्यात आलेली नाही.

यापूर्वी २६ जुलैला लॉस एंजेलिस येथे एका बंदुकधारीने गोळीबार करुन तिघांची हत्या केली. त्यात आणखी दोघे जण गंभीर जखमी झाले होते. हल्लेखोराला पोलिसांनी पकडले असून त्याने आपले वडिल व भावाची हत्या करुन कैनोगा पार्क येथे आपल्या आईवर गोळीबार करुन तिला जखमी केले होते. त्याचबरोबर त्याने गॅस स्टेशनवर एका महिलावर गोळीबार करुन तिची हत्या केली. तसेच नॉर्थ हॉलीवूडमध्ये एका बँकेच्या बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीला लुटण्याचा प्रयत्नात त्याला जखमी केले होते.

आरोग्यविषयक वृत्त –