अमेरिकेच्या ‘कॅपिटल गॅझेट’ वृत्तपत्राच्या कार्यालयात गोळीबार; पाच ठार

एनापोलिस(अमेरिका ) : वृत्तसंस्था

अमेरिकेतील मेरिलँड राज्याची राजधानी असलेल्या ‘एनापोलिस’ या ठिकाणी असलेल्या ‘कॅपिटल गॅझेट’ या वृत्तपत्राच्या कार्यालयात अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

मेरिलॅंडमधील अनापोलिस येथील ‘कॅपिटल गॅझेट’ या वृत्तपत्राच्या कार्यालयात हा गोळीबार झाला. एका अज्ञात व्यक्तीने कार्यालयाच्या मुख्य दरवाज्यातून आत शिरल्यावर कर्मचाऱ्यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरूवात केली. यात अनेकांना गोळी लागून असून अनेक जण जखमी झाले आहेत, तर काहींचा मृत्यू झाला आहे. वृत्तपत्राने विरोधात बातमी छापल्याने हा गोळाबार करण्यात आला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B01N1TEH5A’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6b9b8f37-7b7f-11e8-9d84-17e438dbef6a’]

“जेव्हा तुम्ही डेस्कच्या खाली असता आणि तुम्हाला बंदूकधारी लोक गोळीबार करत असल्याचा आवाज ऐकू येत असतो, तेव्हा यापेक्षा भयानक काहीही असू शकत नाही,” असे कॅपिटल गॅझेटचे पत्रकार फिल डेव्हिसन यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

“विस्कॉन्सिनला जाण्याआधी मला एनापोलिस, मेरीलँडच्या कॅपिटल गॅझेट येथे गोळीबार झाल्याचे सांगितले. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांसोबत तसेच जखमींसोबत माझ्या प्रार्थना कायम आहेत. सध्या तेथे उपस्थित राहिलेल्या सर्वप्रथम प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद देतो.”

– डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका