Video : ‘या’ मतदान केंद्रावर बोगस मतदान करण्याचा प्रयत्न ; हवेत गोळीबार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मेघालय, उत्तराखंड, मिझोरम, नागालँड, सिक्किम आणि तेलंगणातील सर्व लोकसभा मतदारसंघातील जागांवर मतदान होत आहे. याव्यतिरिक्त उत्तर प्रदेशच्या आठ जागा, बिहारच्या चार जागा तर आसाम आणि महाराष्ट्रातील सात जागा, ओडिशातील चार जागा आणि पश्चिम बंगालच्या दोन जागांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे.c

उत्तर प्रदेशात बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी हवेत गोळीबार करण्यात केला. ही घटना उत्तर प्रदेशातील शामली येथील एका मतदान केंद्रावर घडली आहे. याबाबतचा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने दिला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, उत्तर प्रदेशातील शामली येथील एका मतदान केंद्रावर काही जणांकडून बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. याबाबत तेथिल जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘काही जणांकडून निवडणुक ओळखपत्र नसताना देखील मतदान करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. यानंतर सुरक्षेच्या कारणावरून तेथे तैनात असलेल्या BSF जवानांनी हवेत गोळीबार केला. या घटनेनंतर मात्र काही काळ या भागात तणाव निर्मण झाला होता. मात्र त्यानंतर याठिकाणी पुन्हा मतदान सुरळीत सुरु झाले’.