‘बलुचिस्तान नॅशनल पार्टी’च्या ताफ्यावर गोळीबार ; एका नेत्यासह कार्यकर्ते ठार

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – मागील आठवड्यात भारत सरकारने कलम ३७० हटवून जम्मू काश्मीरचे विभाजन केल्यानंतर बलुचिस्तानमधूनही पाकिस्तानच्या प्रभावामधून सोडविण्याची मागणी जोर धरत आहे. या पार्श्ववभूमीवर येथे दहशतवादी कारवायांना ऊत आला आहे. अशातच बलुचिस्तानमध्ये आज(शनिवारी) बलुचिस्तान नॅशनल पार्टीच्या ताफ्यावर झालेल्या गोळीबारात पक्षाचा एक नेता ठार झाला. मृत्यू झालेल्या या नेत्याचे नाव अमानुल्लाह जाहरी असे असून त्यांच्यासह चार ते पाच कार्यकर्ते ठार झाल्याची माहिती आहे. अजूनपर्यंत कोणत्याही दहशतवादी गटाने हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार हे हल्लेखोर मोटारसायकलवरून आले होते. चालू गाडीवरूनच त्यांनी ताफ्यावर जोरदार गोळीबार केला. हा हल्ला झाला त्यावेळी अमानुल्लाह जाहरी यांच्यासहित अन्य नेते आणि कार्यकर्त्यांच्या वाहनाचा ताफा खुजदारच्या भागातून जात होता. या हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पोबारा केला. हा हल्ला करताना बलुचिस्तान नॅशनल पार्टीचे नेता अमानुल्लाह जाहरी हेच टार्गेट होते अशी माहिती पोलिसांनी दिली. या हल्ल्यात या नेत्याच्या नातवाचाही मृत्यू झाला आहे.

काय आहे बलुचिस्तान :
बलुचिस्तान हा भाग १४४८ पासून पाकिस्तानच्या ताब्यात आहे. बलुचिस्तानमधील नेत्यांच्या म्हणण्या नुसार, या प्रांताला इंग्रजांनी ११ ऑगस्ट १९४७ लाच स्वातंत्र्य दिले आहे. तरीदेखील पाकिस्तान मात्र या भागाला त्यांच्या देशाचा हिस्सा मानत आहे. बलुचिस्तानमधील अनेक आंदोलने पाकिस्तानी सैन्याने क्रूरपणे चिरडले आहेत. मागील आठवड्यात भारत सरकारने कलम ३७० हटवून जम्मू काश्मीरचे विभाजन केल्यानंतर बलुचिस्तानमधूनही पाकिस्तानच्या प्रभावामधून सोडविण्याची मागणी जोर धरत आहे. या पार्श्ववभूमीवर येथे दहशतवादी कारवायांना ऊत आला आहे.

जम्मू काश्मीर सीमेवर पाकिस्तानच्या कारवाया सुरूच :
दरम्यान जम्मू काश्मीर सीमेवर पाकिस्तानच्या कारवाया सुरूच असून आज नौसेरा क्षेत्रातील भारतीय सैन्याचे एक लान्स नायक शहीद झाले. पण यानंतर भारताने पलटवार करून पाक सैन्याच्या तीन चौक्या नष्ट केल्या आहेत. या कारवाईत पाकिस्तानी लष्कराचे दोन अधिकारी आणि पाच सैनिक ठार झाल्याचेही वृत्त आहे.

आरोग्यविषयक वृत्त –