हल्लेखोरांकडून व्यावसायिकावर गोळीबार

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – कल्याण पश्चिमेतील बैल बाजार परिसरात राहणार्‍या व्यावसायिकावर हल्लेखोरांनी बेछुट गोळीबार केल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली आहे. याप्रकरणी एमएफसी पोलिस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरूध्द खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यावसायिक मुदस्सर मजीद (39, रा. बैल बाजार परिसर) असे गोळीबार जखमी झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांच्यावर सध्या खासगी रूग्णालयात उपचार चालु आहेत. मंगळवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास मजीद हे एका रिक्षामध्ये बसुन उल्हासनगरच्या दिशेने जात होते. त्याचवेळी वालधुनी पूल ओलांडल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्याजवळ येवुन गोळीबार केला. मजीद यांच्या हाताला आणि पायाला दोन गोळया लागल्या आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह एमएफसी पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.

हल्लेखोरांचा तपास सुरू आहे. याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती कल्याणचे सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली आहे. हल्लो कोणत्या कारणामुळे झाला आणि हल्ला कोणी केला हे मात्र अद्याप समजु शकलेले नाही.