गोळीबार रुपेश पाटीलच्या साथीदाराने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शुक्रवार पेठेतील शिंदे आळीत काल (बुधवारी) भरदिवसा झालेल्या गोळीबार प्रकरणात परस्पर विरोधी खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, गोळीबार नेमका कोणी केला याचा उलघडा आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात गोळीबार हा रुपेश पाटीलच्या गटातील सराईत गुन्हेगार नयन मोहोळ याने केल्याचे स्पष्ट झाले आहे. गोळीबारापुर्वी आरोपींनी एकमेकांवर कोयत्याने वार केलेले आहेत.

पहा CCTV पुण्यात भरदिवसा थरार…..युवकावर गोळीबार : युवक गंभीर जखमी

याप्रकरणी मंदार धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रुपेश चंद्रशेखर पाटील, नयन मोहोळ, निखिल बाबर, शुभम बाबर, संग्राम खामकर, लुकमान नदाफ, विशाल गुंड व त्यांच्या चार ते पाच साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रुपेश पाटील याने दिलेल्या फिर्यादिनुसार, मंदार धुमाळ, मंगेश धुमाळ, गणेश दारवटकर, अभिजित मोहिते, आकाश थापा व इतर चार ते 5 जनांनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदार दिलीप धुमाळ आणि मंगेश दिलीप धुमाळ यांना पोलिसांनी अटक केली आहे.

मंगेश धुमाळ (वय ३२, रा. शिंदे आळी, शुक्रवार पेठ) असे गोळीबारात जखमी झालेल्याचे नाव आहे. धुमाळ याच्या गटातील गणेश दारवडकर व मंदार धुमाळ हे किरकोळ जखमी झाले आहेत. तसेच, दुसर्‍या गटातील रुपेश पाटील आणि विशाल गुंड हेही जखमी झाले आहेत.

पुण्यात भरदिवसा थरार….. युवकावर गोळीबार : युवक गंभीर जखमी

मंगळवारी झालेल्या किरकोळ वादानंतर बुधवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास रूपेश पाटील, विशाल गुंड, नयन मोहोळ हे शिंदे आळीत भांडण मिटविण्यासाठी म्हणून मंगेश धुमाळ याच्याकडे आले होते. यावेळी त्यांच्यात वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि त्यांनी कोयत्याने एकमेकांवर वार केले. यानंतर मंगेश याच्यावर गोळीबार करण्यात आला. यात त्यांच्या पायाला एक गोळी लागली. तर, एक गोळी चुकविण्यात आली. यानंतर मंगेश धुमाळ हा जखमी अवस्थेत थेट पळत खडक पोलिस ठाण्यात गेला. दरम्यान, गोळीबार नेमका कोणी केला, याबाबत माहिती समजत नव्हती. मात्र, गोळीबार रुपेश पाटील याच्या गटातील नयन मोहोळ याने केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. वाद वाढू नये यासाठी शिंदे आळी तसेच धुमाळ याच्या घराजवळ पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आता हे गावठी पिस्तूल नेमके कोणाचे आणि त्याचा परवाना आहे का याबाबतही माहिती घेतली जात आहे.

भरदिवसा झालेल्या गोळीबाराने पुणे हादरले ; ६ तासानंतरही गोळीबाराचे गूढ गुलदस्त्यातच

गोळीबार झाल्याचे समजताच गुन्हे शाखेतील पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक आयुक्त भानुप्रताप बर्गे, समीर शेख यांच्यासह खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.