Pimpri : निगडीत गोळीबार; दोघे जखमी, तिघे गजाआड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – तरुणांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या भावाला पाहण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या भावावरदेखील तेथील तरुणांनी गोळीबार केला. यात तो गंभीर जखमी झाला. ओटास्किम, निगडी येथे बुधवारी (दि. 25) रात्री सव्वाअकराच्या सुमारास गुन्हेगारी टोळीच्या वर्चस्ववादातून गोळीबाराचा हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, आतापर्य़ंत 3 आरोपींना अटक केली आहे.
आकाश बसवराज दोडमणी (वय 23) व रवी बसवराज दोडमणी (वय 26, दोन्ही रा. ओटास्किम, निगडी), असे जखमी झालेल्या दोघा भावांची नावे आहेत. या प्रकरणी तर आकाश दोडमणी याने फिर्याद दिली आहे.
त्यानुसार यश अतुल कदम ऊर्फ रघू (वय 20 ), विजय शिंदे ऊर्फ चोरगुंड्या (वय 32), प्रदीप जगदाळे, विशाल सोळसे (सर्व रा. ओटास्किम, निगडी), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच किरण शिवाजी खवळे (वय 28, रा. ओटास्किम, निगडी), रोहन चंडालिया (वय 24, रा. जाधववस्ती, रावेत), मनोज हांडे (वय 25, रा. चिखली) यांच्यासह इतर 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खवळे, रघू, चोरगुंड्या, जगदाळे, सोळसे, चंडालिया, हांडे तसेच इतर 10 जणांनी संगनमत करून फिर्यादी आकाश दोडमणी याचा भाऊ रवी दोडमणी याला लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर भावाला का मारहाण झाली हे पाहण्यासाठी फिर्यादी आकाश तेथे गेला. त्यावेळी आरोपी यांनी बेकायदेशीर जमाव जमविला. तू तेथेच थांब, आता तुला गोळी घालून ठार मारतो, असे बोलून आरोपी रघू, चंडालिया व हांडे यांच्यापैकी एकाने फिर्यादी यांच्या दिशेने पिस्तुलातून गोळी झाडली. आरोपीने फिर्यादी यांना जिवे मारण्याचा व फिर्यादी यांचा भाऊ रवी दोडमणी यास गंभीर जखमी करून दहशत माजवल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.