अफगाणिस्तानमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या कार्यक्रमावर दहशतवादी हल्ला

काबूल : वृत्तसंस्था – अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांच्या कार्यक्रमात दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात आगामी निवडणूकीतील राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार असेलेले लतीफ पेड्रम यांच्यासह अनेकजण जखमी झाले आहेत.
https://twitter.com/ANI/status/1103565107852767232
शिया हजारा नेते अब्दुल अली मझारी यांच्या २४ व्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात हा हल्ला झाला आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम सुरू असताना दहशतवाद्यांनी गोळीबार करत उखळी तोफांचा मारा केला. या हल्ल्यात अफगाणिस्तानचे माजी सुरक्षा सल्लागार हनीफ अत्तार व त्यांचे आठ सुरक्षा रक्षक, राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार असेलेले लतीफ पेड्रम जखमी झाले. स्फोटानंतर करझाई यांच्यासह सर्व नेत्यांना पोलिसांनी सुरक्षित स्थळी हलविले.

गेल्या अनेक दशकांपासून अफगाणिस्तान हे दहशतवादाला बळी पडत आहेत. गेल्या काही काळात अफगाणिस्तानात आत्मघातकी हल्ल्यांची संख्याच नाही तर तीव्रताही वाढली आहे . ऑक्टोबरमध्ये शिया मशिदीवर झालेल्या हल्ल्यात ३९ जणांचा मृत्यू झाला होता. डिसेंबरमध्ये काबूलमध्ये सरकारी इमारतीवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात ४३ जण ठार झाले होते.