पैशाच्या वादातून गोळीबार, जिल्ह्यात प्रचंड खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पैशाच्या वादातून डोक्याला गावठी कट्टा लावून हवेत गोळीबार करण्यात आला. राहुरी तालुक्यातील उंबरे गावात काल सायंकाळी ही घटना घडली.

याप्रकरणी सुजित नारायण काळे, नारायण रघुनाथ काळे (दोघे रा. उंबरे, ता. राहुरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, शिवाजी मनोहर शिरसाठ (वय 41) व त्यांचे मेहुणे दादासाहेब हे दोघेजण पशुखाद्यासाठी उंबरे गाव शिवारात एस.टी. स्टॅड जवळ गेले होते. शहाराम आडसुरे यांचे गणेश कृषी सेवा केंद्र समोर गेले असता नारायण काळे व दादासाहेब पाषाण यांच्यात जुन्या पैशावरून शाब्दिक वाद झाले.

वाद घालू नका काय असेल ते व्यवहार मिटवून घ्या, आम्ही पैसे द्यायला आलो आहोत, असे सांगत असतानाच त्याचा राग येऊन सुजित काळे याने पशुखाद्याच्या दुकानातून येऊन त्याच्या हातातील गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केला. तसेच गावठी कट्टा फिर्यादीच्या डोक्याला लावून जीवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान पाषाण याने धक्का देऊन काळे यास ढकलत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी राहुरी पोलीस स्टेशन येथे सुजित नारायण काळे व नारायण रघुनाथ काळे (दोघे रा. उंबरे, ता. राहुरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘पिवळे दात’ होतील पांढरेशुभ्र आणि मजबूत ! करा ‘हे’ घरगुती उपाय

डायबिटीज, सर्दी, ताप, कावीळ या आजारांवर भेंडी आहे गुणकारी

औषध न घेताही नियंत्रणात ठेवू शकता कोलेस्टेरॉल, हे आहेत ५ उपाय

केवळ पौष्टिकच नाही तर औषधीही आहे ‘उडीद डाळ’ ; जाणून घ्या फायदे

पावसाळ्यात ‘अस्वच्छ’ पाणी पिल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

सेक्सलाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी घ्या ‘हा’ आहार

उपचाराबाबत निष्काळजीपणा केला तर ‘डॉक्टरांवर’ होणार कारवाई