पुण्यातील चांदणी चौकात ‘गोळीबार’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर चांदणी चौकाजवळ दुचाकीवरून निघालेल्या तरुणावर तिघांनी पिस्तूलातून गोळीबार केला. यामध्ये गोळी लागल्याने तरुण जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना बुधवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास घडली.

तुषार प्रकाश पिसाळ (२५ रा. खेड शिवापुर) याच्यावर गोळीबार झाला असून तो जखमी आहे. तर सागर पालवे, राजू तावरे, अतुल चांदणे या तिघांनी गोळीबार केली असण्याची शक्यता पोलिसानी वर्तवली आहे.

हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चांदणी चौक येथे दुचाकीवरून निघालेल्या तुषार याच्यावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये गोळी लागल्याने तो जखमी झाला. गोळीबार चा आवाज ऐकून चांदणी चौकात बंदोबस्त करत असलेले वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक घटनास्थळी पळाले. जखमी तुषार ला रुग्णालयात हलवले. मात्र गोळीबार करणारे फरार झाले. हिंजवडी पोलीस घटनास्थळी पोहचले असून हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. गोळीबार करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनास्थळी दुचाकी आढळली आहे.

Loading...
You might also like