Firing In Islampur | कव्वालीच्या कार्यक्रमात हवेत गोळीबार करणारा राष्ट्रवादीचा माजी नगरसवेक गजाआड

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – इस्लामपूर मोमीन मोहल्ला (Islampur Momin Mohalla) येथे एका कवाली कार्यक्रमाच्या मंचावरूनच माजी नगरसेवकाने हवेत गोळीबार (Firing In Islampur) केल्याची घटना उघडकीस आली आहे. हवेत गोळीबार (Firing In Islampur) केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या प्रकरणी राष्ट्रवादीचे (NCP) माजी नगरसेवक पिरअली पुणेकर (Former Corporator Pirali Punekar) यांना अटक (Arrest) करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती इस्लामपूर शहर पोलीस ठाण्याचे (Islampur City Police Station) पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण (Police Inspector Shashikant Chavan) यांनी दिली.

 

काय आहे संपूर्ण प्रकरण ?
इस्लामपूर शहरात पैगंबर जयंतीनिमित्त ख्वाजा गरीब नवाज सोशल वेलफेअर ट्रस्टच्या (Khwaja Garib Nawaz Social Welfare Trust) वतीने सोमवारी सायंकाळी 7 वाजता आमिल आरिफ साबरी (Amil Arif Sabri) यांचा बज्मे कव्वालीचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. या कार्यक्रमावेळी हा प्रकार घडला. एका पक्षाचे हे माजी नगरसेवक नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतात. पूर्वीच्या वादातून मोमीन मोहल्ला परिसरातील पक्षाचे कार्यालय फोडण्यात आले होते.

काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादीच्या (NCP) माजी उपनगराध्यक्षांशी त्यांचा जोरदार वाद झाला होता.
चार दिवसापूर्वी मोमीन मोहल्ला येथे कव्वालीचा कार्यक्रम चांगलाच रंगला होता. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
हजारो नागरिकांच्या उपस्थितीत कव्वालीच्या मंचावरून या माजी नगरसेवकाने हवेत गोळीबार (Firing In Islampur) केला.
त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या कार्यक्रमास माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
जयंत पाटील (Jayant Patil) यांनी कार्यक्रमासाठी काही वेळ उपस्थिती लावत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या होत्या.
या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी कसून तपास करत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पिरअली पुणेकर (Pirali Punekar) यांच्यावर गुन्हा (Crime) दाखल करून त्यांना अटक केली आहे.

 

Web Title :- Firing In Islampur | Former NCP councilor Gajaad who fired in the air during Qawwali program

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sandipan Bhumre | नाराज संजय शिरसाटांना मंत्रिपद मिळणार की लटकवणार, मंत्री भुमरे स्पष्टच बोलले…

Andheri by-Election | ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला तर? ठाकरेंचा प्लॅन बी

Subhash Desai | घोडा मैदान आता लांब नाही, शेलारांच्या टीकेला सुभाष देसाईंचे प्रत्युत्तर