लातूर बसस्थानकात गोळीबार ; शहरात खळबळ

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – लातूर बसस्थानकात अज्ञाताने गोळीबार केल्याची घटना गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. बसस्थानकात झालेल्या या गोळीबारात गोळी हल्लेखोरालाच लागून तो जखमी झाला. परंतु तो तात्काळ तेथून पसार झाला. दरम्यान बसस्थानकात गोळीबार झाल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. गोळीबार कोणी केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

पंढरपूर-हदगाव ही नांदेडमार्गे जाणारी बस रात्री साडे अकराच्यादरम्यान लातूर स्थानकात आली तेव्हा चालक आणि वाहक नाश्ता करण्यासाठी खाली उतरले. त्याचवेळी बसमधून एका प्रवाशाने बाहेर असलेल्या व्यक्तीवर गोळी झाडली परंतु ती खिडकीच्या रॉडला धडकून ती त्यालाच लागली. तो स्वतःच जखमी झाला. त्यानंतर तो लागलीच पसार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गोळी झाडण्यात आलेल्या ठिकाणाची पाहणी केली. हल्लेखोराला नक्की कोणावर निशाणा साधायचा होता, याचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like