मावळातील वेहेरगावात झालेल्या गोळीबारात तरुण जखमी

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन – मावळ तालुक्यातील वेहेरगाव येथे एका लॉजवर गोळीबार करुन प्राणघातक हल्ला करण्यात आला असून त्यात एक तरुण जखमी झाला आहे. मंथन सातकर (रा. कान्हे, मावळ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना वेहेरगाव येथील तुरे लॉज येथे मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

मंथन सातकर याच्यावर कामशेत येथील शिंदे याने आपल्याकडील गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. मंथन यांच्या खांद्याला गोळी लागली असून त्याच्यावर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. या घटनेची माहिती समजताच लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक लुकडे व अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. हा हल्ला कशावरुन केला याविषयी अद्याप माहिती मिळू शकली नाही.

आरोग्यविषयक वृत्त –