नुकसान भरपाई मिळू न दिल्याने आंबेठाण येथे गावठी पिस्तूलने खुनी हल्ला 

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन – गाडीची नुकसान भरपाई मिळू न दिल्याचा राग मनात धरून एका केटरिंग व्यवसायिकावर गावठी पिस्तूल मधून जीवघेणा हल्ला केल्याची घटना आंबेठाण ( ता. खेड ) येथे घडली आहे.

काही दिवसांपूर्वी मांडेकर नावाच्या व्यक्तीच्या गाडीचा अपघात झाला, दरम्यान अपघात झाल्या नंतर मांडेकर गाडीची नुकसान भरपाई मागत होते, त्यावेळी चवहीन यांनी मध्यस्थी करत त्यांना नुकसान भरपाई मिळू दिली नाही, मांडेकर यांनी हाच राग मनात धरून काल  शुक्रवारी ( दि. २१ ) रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास आंबेठाण गावात मध्यस्ती करणारे शांताराम दत्तात्रय चव्हाण ( वय ३३ वर्षे ) यांना थांबवून आपल्या कडील गावठी कट्टा हा चव्हाणच्या डोक्यास लावला.

त्यावेळी त्याच्या सोबत असणारे त्यांचे चुलत भाऊ गणेश चव्हाण मोठ्याने ओरडल्याने चव्हाण यांनी आरोपीचा हाताला धक्का दिल्याने पिस्टलमधून गोळी हवेत फायर झाली. आरोपीच्या हातातून गावठी कट्टा हिसकावून घेत असताना आरोपींनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पिस्तुलाने गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान  चाकण पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा नोंद झाला असून, आरोपी निलेश उर्फ जगु नवनाथ मांडेकर ( वय २६ वर्षे ) यास ताब्यात घेण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर खेड न्यायालयाने निलेश उर्फ जगु नवनाथ मांडेकर यास २४ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.