भुसावळमध्ये जळगावच्या युवकावर गोळीबार, संपूर्ण जिल्ह्यात खळबळ

भुसावळ : पोलीसनामा ऑनलाइन – भुसावळ येथे कुटुंबियांना भेटण्यासाठी आलेल्या तरुणावर शनिवारी रात्री गोळीबार करण्याची घटना घडली. खलील अली मोहम्मद शकील (वय २५, रा. गेंदालाल मिल, जळगाव) असे या तरुणाचे नाव आहे. खडका रोडवरील चौफुली येथे रात्री ८ वाजता ही घटना घडली.

खलील शकील हा मुळचा भुसावळ येथील रहिवासी असून कुटूंबीय त्याठिकाणी वास्तव्यास आहेत. सध्या तो जळगावातील गेंदालाल मिल परिसरात काकांकडे राहत आहे. शनिवारी तो भुसावळला कुटुंबियांना भेटण्यासाठी गेला होता. त्यानंतर रात्री ८ वाजता घरी जाण्यासाठी भुसावळातील खडका रोड येथे आला. त्यावेळी विक्की व त्याचे चार साथीदार त्याठिकाणी आले व तू खूप दिवसांनी भेटला म्हणत वाद घालू लागला.

विक्की आणि त्यासोबतच्या एका तरुणाकडे बंदूक होती. त्या दोघांनी सुरुवातीला ३ वेळा हवेत गोळीबार केला. त्यानंतर खलीलच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी खलीलच्या हाताला लागली आणि तो गंभीर जखमी झाला. त्याला काही लोकांना पोलीस ठाण्यात नेले. त्याचा जबाब नोंदवून घेतला. प्राथमिक उपचारानंतर त्याला पोलीस बंदोबस्तात जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले.

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

You might also like