भरदिवसा गोळीबाराचा थरार ; ‘त्या’ कुख्यात गुंडाचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील कुर्ला परिसर आज गोळीबाराच्या घटनेने हादरुन गेला. भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या थरारामध्ये एका कुख्यात गुंडाचा मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवार) सकाळी दहाच्या सुमारास कुर्ल्याच्या हलाल पूल परिसरात घडली. कुख्यात गुंड जानू पवार उर्फ बिल्ला असे मृत्यू झालेल्या गुंडाचे नाव आहे.

घटनेची माहिती मिळताच, व्ही.बी.नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ही गँगवॉरची घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. या भागात फिरणारा गुंड जानू पवार उर्फ बिल्ला याच्यावर सकाळी दहाच्या सुमारास दोन बाईकस्वारांनी समोरुन बिल्लावर गोळ्या झाडून ते फरार झाले. बिल्लाला विनोबा भावे नगर पोलिसांनी गंभीर अवस्थेत जवळच्या सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. बिल्ला हा सध्या जामिनावर तुरुंगाच्या बाहेर आला होता.

बिल्लावर त्याच्याच सावत्र भाऊ विनोद पवार याने हल्ला केला. या हल्ल्यानंतर विनोदने पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. विनोदला बिल्लाचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याला होता, अशी प्राथमिक माहीती आहे.सकाळी विनोदने कुर्लाच्या हलाल पुलावर गाठून त्याच्यावर तीन राऊंड फायर केले. या गोळीबारात बिल्लाचा मृत्यू झाला.

Loading...
You might also like