विद्यार्थी नेता उमर खालिदवर गोळीबार 

नवी दिल्लीः वृत्तसंस्था

जेएनयू मधील विद्यार्थी नेता उमर खालिदवर काॅन्स्टिट्यूशन क्लब आॅफ इंडियाच्या बाहेर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला आहे. या हल्ल्यात उमर खालिद बचावला असून, तो सध्या सुखरुप आहे.
[amazon_link asins=’B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’34b2aae7-9edf-11e8-93be-c9ffd283f3d8′]

एका कार्यक्रमासाठी उमर खालिद काॅन्स्टिट्यूशन क्लब आॅफ इंडियाजवळ आला होता. यावेळी तो त्या ठिकाणी असलेल्या एका चहाच्या टपरीजवळ आपल्या सहकाऱ्यांसह उभा होता. त्यावेळी पांढरा शर्ट घातलेल्या एका अज्ञात इसमाने खालीदवर गोळीबार केला. यातून उमर खालिद थोडक्यात बचावला. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

निर्भय स्वातंत्र्य दिशेने या विषयावरील एका चर्चासत्राला उमर उपस्थित होता अशी प्राथमिक माहिती आहे. उमरवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीची अोळख अद्याप पटलेली नसल्यामुळे त्याच्यावर हा हल्ला का करण्यात आला याचे कारण देखील अस्पष्ट आहे.

पाहा नेमका कोण आहे उमर खालीदः

खालिद हा डीएसयू म्हणजेच डेमोक्रेटिक स्टूडंट या युनियनचा विद्यार्थी नेता आहे. या संघटनेला भाकपची विद्यार्थी संघटना म्हणून अोळखलं जातं. जेएनयू आणि दिल्ली या विद्यापीठामध्ये ही संघटना कार्यरत आहे.

संसदेवर हल्ला केल्याप्रकरणी अफझल गुरूला फाशी ठोठावल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी 9 फेब्रुवारी 2016 रोजी उमर खालिदसह काही विद्यार्थ्यांनी जेएनयूमध्ये कार्यक्रम आजोजित केला होता, असा जबाब कन्हैया कुमारने दिला होता. यावरून उमरला निलंबित करण्यात आलं होतं. जेव्हा देशविरोधी घोषणाबाजी सुरू होती, त्यावेळी खालिदची उपस्थिती होती. खालिदचं महाराष्ट्र कनेक्शन असल्याचंही समोर आलं होतं. अमरावती जिल्ह्यातील तळेगावमध्ये त्याच्या पालकांचं वडिलोपार्जित घर आहे. मात्र 35 वर्षापूर्वी उमरचं कुटुंबं अमरावती सोडून दिल्लीला स्थायिक झालं.