Pune/Pimpri : परिसरात दहशत पसरविण्यासाठी भोसरीत गोळीबार !

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – मैत्रिणीला सोडायला येत असलेल्या तरुणास पिस्तुल दाखवून दुचाकी थांबवण्यास भाग पाडले, तरुणास ढकलून देऊन, बाजूला गोळीबार केला. हि घटना लांडेवाडी भोसरी येथे शुक्रवारी रात्री पावने बाराच्या सुमारास घडली.

या प्रकरणी अक्षय सुरेश कांबळे (२६, रा. वडगाव शेरी) याने फिर्याद दिली आहे. तर दोन अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय हा लांडेवाडी येथील विकास कॉलनी मध्ये राहणाऱ्या त्याच्या मैत्रिणीकडे नेहमी येत असतो. शुक्रवारी रात्री नेहमी प्रमाणे तो मैत्रिणीला सोडविण्यासाठी दुचाकीवरुन येत होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्याला पिस्तुल दाखवून थांबवले. त्यानंतर त्याला ढकलून देऊन त्याच्या बाजूला पिस्तुलातून गोळीबार केला.

गोलीबार झाल्याने आवाज ऐकून नागरिक जमा झाले. त्यावेळी गोळीबार करणारे पळून गेले. पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. परिसरात दहशत माजविण्यासाठी आणि मुलीच्या प्रकरणातून हा प्रकार घडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिस आरोपींच्या मागावर आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like