प्राचार्य आणि शिक्षकाकडून KGच्या शिक्षिकेवर सामुहिक बलात्कार, ‘ती’ प्रेग्‍नंट झाल्यावर प्रचंड खळबळ अन् पर्दाफाश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील फिरोजाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका खासगी शाळेत मुख्याध्यापक आणि एका शिक्षकाने मिळून एका महिला शिक्षकावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. हि महिला 21 आठवड्यांची गर्भवती राहिल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. त्यानंतर या महिला शिक्षिकेच्या नातेवाईकांनी या आरोपींविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत सामूहिक बलात्कार आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार,16 वर्षीय पीडित मुलगी हि मागील वर्षी मुस्तफाबाद येथील एका खासगी शाळेत प्रायमरी शिक्षिका म्हणून काम करत होती. मागील मे महिन्यात तिच्यावर या मुख्याध्यापक आणि शिक्षकाने बलात्कार केला. त्यांनतर त्यांनी पिडीतेला या घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडितेने कुणालाही याबाबत माहिती दिली नाही.

यावेळी पीडितेच्या भावाने सांगितले कि, आरोपींची तिला प्रशिक्षणाच्या नावाखाली जबरदस्ती शाळेत थांबवून घेतले. त्यानंतर तिच्यावर दोघांनी बलात्कार केला. पीडितेने 21 आठवडे कुणालाही याबाबत सांगितले नाही. मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर देखील ते तिला धमकावत होते. याविषयी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले कि,आरोपींच्या अटकेसाठी प्रयत्न केले जात आहेत. वैद्यकीय अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचे सिद्ध झाले आहे. त्यानुसार पीडितेच्या जबाबानुसार पुढील कारवाई सध्या सुरु आहे.

दरम्यान, पोलिसांनी या आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यांच्या शोधासाठी पथके देखील रवाना करण्यात आली आहेत. मुलीच्या वडिलांचे निधन झाले असून आई शिलाईचे काम करून आपल्या मुलांचे पालन पोषण करत आहे. त्यामुळे आईला मदत होण्यासाठी पीडिता शिकवण्यासाठी जात असे.

visit : Policenama.com 

You might also like