‘राफेल’ आणि ‘सुखोई’ एकदाच ‘टेकऑफ’ करतील तेव्हा शत्रूची ‘भंबेरी’ उडेल, वायुसेनेच्या प्रमुखांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मे 2020 पर्यंत चार राफेल विमान अंबाला येतील. भारतीय वायुसेना आपल्या बाकी लढाऊ विमानांचे अत्याधुनिकरण करत आहे. ही विमाने जशी अत्याधुनिक होतील आपली वायुसेना देखील तितकीच ताकदवान होईल. कारण राफेल आणि सुखोई – 30 MKI चं कॉम्बिनेशन अत्यंत अत्याधुनिक असणार आहे. कारण जेव्हा हे दोन्ही एकत्र उडतील तेव्हा शत्रूला घाम फुटेल असे खुद्द एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी सांगितले.

एअर चीफ मार्शल राकेश भदौरिया यांनी सांगितले की लोकांना वाटते की राफेल आल्याने आपली ताकद कशी वाढेल. परंतु आपली लढाऊ विमाने अत्याधुनिक होत आहेत. आपण राफेल आणि सुखोई – 30 एमकेआयचे अत्यंत अत्याधुनिक लीथल कॉम्बिनेशन तयार करत आहोत. त्यात फ्लाइंग रिफ्युलिंगचे प्रमाण वाढत आहेत.

वायुसेनेचा प्रमुख भदौरिया म्हणाले की, आपला संरक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत आहे. वायुसेनेत विकासाचा अभ्यास सुरु आहे. वायुसेनेत विकास होत आहे. आता उप महाद्विपीय धोका जास्त आहे, त्याविरोधात लढणे आवश्यक आहे. हे पारंपारिक युद्धा सारखे नाही. टारगेटला उधवस्त करणे आवश्यक आहे. आपले नुकसान आणि कोलॅटरल डॅमेज कमी होईल. याचा प्रयत्न केला जात आहे. मे 2020 मध्ये चार राफेल येईल. यानंतर सुखोई – 30MKI बरोबर त्याचे कॉम्बिनेशन अत्यंत अत्याधुनिक आहे.

आम्ही सगळे रडार जोडले आहेत, आता संपूर्ण देश सुरक्षेच्या नजरेत आहे
भदौरिया म्हणाले की आम्ही संपूर्ण देशातील रडार एकत्र जोडले आहेत. त्याची योग्य नेटवर्किंग घेण्यात आली आहे. यामुळे आपला संपूर्ण देश सुरक्षेच्या नजरेत आहेत. 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. जमिनीवरुन आकाशात मिसाइल आणि आकाश सिस्टम आल्याने आपली वायू सुरक्षा प्रणाली मजबूत झाली आहे.

10 वर्षात आपल्याकडे असेल अत्याधुनिक विमान
भदौरिया म्हणाले की पुढील 10 वर्षात जी काही योजना आहे, त्याला वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. 40 एलसीए ऑर्डर करण्यात आली आहे, 83 एलसीए आणि ऑर्डर करण्यात येईल. आपल्याकडे लढाऊ विमानांची संख्या वेगाने वाढेल. त्यानंतर एलसीएचे मार्क – 2 विमान आणण्यात येईल. याचा निर्माण देखील सुरु होईल. डीआरडीओ मदत करत आहे. रडार सिस्टम देखील पूर्णता 6 ते 8 वर्षात स्वदेशी होईल.

5 व्या पीढीला स्टिल्थ जनरेशन फायटर बनवण्याचा प्रयत्न
एअर चीफ मार्शल भदौरिया म्हणाले की इलेक्ट्रॉनिक वारफेअर वेगाने पुढे सुरु आहे. डीआरडीओच्या मदतीने आम्ही रडार आणि फायटर जेट्समध्ये स्वदेशी इलेक्ट्रॉनिक वारफेअर लावण्यात येतील. एअरफोर्स कायमच स्वदेशी विकासाच्या बाजूने आहे. आम्ही 5 व्या पीढीचे स्टिल्थ फायटर तयार करत आहे. 100 किमीपेक्षा जास्त एअर टू एअर मिसाइल बनवण्याच्या तयारीत आहे. लॉन्ग रेंज मिसाइलमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजेंस सहभागी असेल.

भविष्य मानव आणि मानवविरहित लढाऊ विमानांच्या कॉम्बिनेशनचे आहे
एअर चीफ मार्शल भदौरिया म्हणाले की भारतीय वायू सेना भविष्यात लढाऊ मानवविरहित विमान बनवण्याच्या तयारीत आहोत. हे माणसांकडून उडविण्यात येणाऱ्या लढाऊ विमानांबरोबर उडेल जे आधिक अत्याधुनिक असेल. तसेच यात हॉयपरसॉनिक विमानं सहभागी असतील. जी आपण बनवलेली असतील. सध्या कॅपेबिलिटी तयार करण्यात अधिक खर्च येत आहेत. फेजवाइज असेल. हळू हळू विकास होईल.

स्वदेशीला पुढे आणण्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागेल
भदौरिया म्हणाले की, आपल्याला देशातच लढावू विमानं तयार करायची आहेत. स्वदेशी होण्याने पैसे बचत होतील. जर आपण तयार केलेली विमानं बाहेर गेली तर पैसा देखील निर्माण होईल. डीआरडीओला पुढे न्यायला हवे. पीएसयूला वेगाने काम करायला हवे. खासगी कंपन्यांना पुढे यावे लागेल. ज्याने स्वदेशीला प्रोस्ताहन मिळेल.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/