भारतीय पती अन् कुवेतची पत्नी पुणे न्यायालयाने 10 दिवसात निकाली काढलं घटस्फोटाचं ‘प्रकरण’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यात १० दिवसात घटस्फोटांचा खटला निकाली लावला आहे. एवढ्या कमी दिवसात घटस्फोटाचा खटला निकाली काढल्याचे हे पुण्यातील पहिलेच प्रकरण आहे. पुण्यात घटस्फोटांचा खटला दाखल केल्यानंतर कुवेत मधील पत्नीला आणि पुण्यात स्थायिक झालेल्या पतीला फक्त १० दिवसात घटस्फोट मिळाला आहे.

पती पुण्यात, पत्नी कुवेतमध्ये

एका जोडप्याने पुण्याच्या कौटूंबिक न्यायलायात दाखल केलेले हे प्रकरण न्यायाधीश सुभाष काफरे यांनी निकाली काढला. या दोघांचे लग्न २०१३ साली झाले होते. पती पुण्यात आणि पत्नी मुलासह आई-वडिलांना घेऊन कुवेत मध्ये राहत आहे. पत्नी मुलगा झाल्यानंतर फक्त १५ दिवसासाठी भारतात आली होती. त्यामुळे त्यांच्या एकत्र येण्याचा आशा संपल्या होत्या. तर पत्नीने पतीवर आणि त्यांच्या नातेवाइकांवर शारीरिक आणि मानसिक छळाचा दावा केला. तशी रितसर नोटीस पत्नीने पतीला पाठवली. त्यानंतर या दोघांमध्ये आणखी वाद झाला.

विशेष विवाह कायद्यानुसार प्रकरण निकाली

पत्नी कुवेतला राहते त्यामुळे ती दर तारखेला न्यायालयात दाखल होऊ शकत नव्हती त्यामुळे तिने आपल्या वकिलांना विशेष विवाह कायद्यानुसार समंतीने घटस्फोटाचा अर्ज दाखल करण्यास सांगितला.

पत्नीच्या वकिलाने तिला ६ महिने वाट पाहणे शक्य नसल्याचे सांगितले, कारण तिला सुट्ट्या नसल्याने पुन्हा कुवेतला जायचे होते. त्यामुळे कोर्ट कमिश्नरची नेमणूक करुन व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून तिची साक्ष घेण्यात आली आणि १० दिवसात खटला निकाली काढत घटस्फोट देण्यात आला.

आरोग्यविषयक वृत्त –