विधानसभा 2019 : पहिली लढत ठरली, ‘या’ ठिकाणी काँग्रेस vs शिवसेना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेने आपल्या 18 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले. तर काँग्रेसने आपल्या 51 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये करवीर मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.एन. पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेनेने चंद्रदीप नरके यांना एबी फॉर्म दिल्याने राज्यातील पहिली निवडणूक याच विधानसभा मतदारसंघात ठरल्याचे दिसून येत आहे.

शिवसेनेने कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर, सावंतवाडीमधून विद्यमान आमदार तथा गृहमंत्री दीपक केसकर, औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघातून संजय शिरसाट यांना संधी देण्यात आली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील सहा विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. चंदगडवरून संग्राम कुपेकर, करवीरमधून आमदार चंद्रदीप नरके, कागलमधून संजय घाडगे, शाहुवाडी सत्यजीत पाटील, हातकणंगले, डॉ. सुजित मिणचेकर, राधानगरी प्रकाश आबिटकर, शिरुळ उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसने आपली यादीमध्ये करवीर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.एन. पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर राज्यातील पहिली लढत ठरली आहे. पी.एन. पाटील हे स्वर्गीय नेते विलासराव देशमुख यांचे निकटवर्तीय असून त्यांना दोन वेळा चंद्रदीप नरके यांनी पराभूत केले आहे.

Visit : Policenama.com