Coronavirus : 39 दिवसांपर्यंत ‘वेगळं-वेगळं’ राहणं सोपं नव्हतं, भारतामधील ‘कोरोना’ बाधित पहिल्या रूग्णानं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील कोरोनाव्हायरसची लागण होणारी पहिली विद्यार्थिनी आता पूर्णपणे बरी झाली आहे. 30 जानेवारीला केरळच्या त्रिशूरमधील एका विद्यार्थिनीमध्ये संसर्गाची पहिली घटना समोर आली होती. उपचारा दरम्यान तिला 39 दिवस आईसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. आता तिला रुग्णालयातून  डिस्चार्ज देण्यात आला आहे. चीनच्या वुहानमधील एका विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या 20 वर्षीय विद्यार्थिनीने सांगितले की, “इतके दिवस वेगळे राहणे सोपे नव्हते.” यावेळी समुपदेशकांनी नियमितपणे माझ्या मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले. ”

विद्यार्थिनीने सांगितले कि, “जेव्हा माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मी माझ्यासोबत असलेल्या  सर्व मित्रांना बोलावले आणि सर्वांना  डॉक्टरांच्या संपर्कात राहण्यास सांगितले. आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की ते सर्व निरोगी होते. जेव्हा मला माझ्या संसर्गाबद्दल कळले तेव्हा डॉक्टर आणि अधिकारी माझ्याकडे आले आणि त्यांनी बर्‍याच गोष्टींबद्दल मला तपशीलवार विचारले. मी आलेली फ्लाइट, त्याप्रमाणे माझा सीट नंबर, माझ्याबरोबर आलेल्या लोकांचा तपशील. त्यांनतर  केरळचे आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांनी माझ्या आईला बोलवून धीर दिला. घरी आल्यावरही इतके दिवस  आईसोलेशनमध्ये   राहणे सोपे नव्हते.

विद्यार्थिनीने सांगितले कि,13 जानेवारी रोजी वुहान विद्यापीठ चार आठवड्यांसाठी बंद होते तेव्हा मला कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नव्हती. रस्त्यावर सर्व काही सामान्य दिसत होते. 17 जानेवारी पर्यंत लोक मास्क घालून रस्त्यावर निघत असत. परंतु त्यांनतर परिस्थिती आणखी बिकट झाली. आमची सुट्टी फक्त चार आठवड्यांसाठी होती. तसेच  विमानाचे भाडे बघता मी भारतात जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही 23 जानेवारीसाठी तिकीट बुक केले. बिघडलेल्या परिस्थितीमुळे उड्डाण सेवा पूर्वीपासूनच बंदी घातल्यामुळे आम्हाला कूनमिंग ते कोलकाताला जावे लागले.  चीनमध्ये सर्वत्र सक्तीने तपासणी केली जात होती. विद्यापीठातून बाहेर पडताना,  त्यानंतर विमानतळ, रेल्वे स्थानकांवरही अशीच तपासणी करण्यात आली. 23 जानेवारीला वुहान येथून सुमारे 20 विद्यार्थी कोलकाता येथे पोहोचले. त्यातील काही दुसर्‍या दिवशी केरळला रवाना झाले. ”

विद्यार्थिनीने पुढे सांगितले की, मला मिळालेल्या एका संदेशानुसार भारतात परतल्यानंतर जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्यास सांगितले. यानंतर, मला आरोग्य अधिकाऱ्यांकडून  दररोज कॉल येऊ लागले. मला सामान्य वाटत होतं. 27 जानेवारीला माझ्या घश्यात खाज सुटली. मी त्यांना लगेच माहिती दिली. त्यानंतर त्यांनी मला आणण्यासाठी रुग्णवाहिका पाठविली आणि मला सामान्य रुग्णालयात दाखल केले. आईसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केल्यांनतर मला नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. माझ्या नमुन्यांसह आणखी चार लोक होते. त्या चौघांचे निकाल नकारात्मक होते. पण, मला काहीही सांगण्यात आले नाही. यानंतर मला संशयास्पद वाटू लागले आणि त्यांनतर मला कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचे माहिती मिळावी. त्यांनतर, डॉक्टरांची आणि परिचारिकांची एक टीम माझ्याकडे आली. सर्व वैद्यकीय उपचारानंतर, जेव्हा मी पूर्णपणे बरे झाले तेव्हा मला सांगण्यात आले आणि माझा दुसरा रिझल्ट नकारात्मक झाला.” 20 फेब्रुवारीला मला रुग्णालयातून सोडण्यात आले. पण घरी 14 दिवस वेगळे ठेवण्यात आले.

वुहानमध्ये  विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने घेतायेत शिक्षण  : 
वुहानमध्ये शिकणाऱ्या बर्‍याच विद्यार्थ्यांप्रमाणेच तीची  देखील चीनमध्ये जाण्याची भूमिका स्पष्ट नाही. चार आठवड्यांच्या सुट्टीनंतर 15 फेब्रुवारीला विद्यापीठ सुरु होणार आहे. विद्यार्थिनीने सांगितले कि, माझ्या वर्गात 65 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 45 भारतीय आहेत. आत्ता आम्ही ऑनलाईन क्लास करीत आहोत. कोरोनाव्हायरसच्या परिणामाच्या दृष्टीने याची सुरूवात केली गेली आहे. अधिकाऱ्यांनी बंदी उठवल्यानंतरच आम्ही वुहानमध्ये परत येऊ.