मित्राने पहिल्यांदा केली आर्थिक फसवणूक, मग केला खून

डोंबिवली : पोलीसनामा ऑनलाईन – सरकारी नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून मित्राकडून ३५ लाख रुपये लाटले. मात्र, नोकरी न लागल्याने ज्यावेळी पैशांसाठी तगादा लावला त्यावेळी त्याने मित्राचा काटा काढला. आरोपी मित्र स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. ही घटना कल्याण येथील बिर्ला कॉलेज परिसरातील ट्युक्स लॉजमध्ये घडली.

हैद्राबादहून पुण्यात पिस्टल विक्रीसाठी आलेल्या इंजिनिअरला अटक

अनिल सानप असे मृताचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी संतोष बरदडे याला पोलिसांनी अटक केली आहे.

कल्याणमध्ये राहणाऱ्या अनिल सानप व संतोष बरदडे हे दोघे मित्र होते. अनिलने आरोपी संतोषला सरकारी नोकरी लावून देतो असे सांगत त्याच्याकडून ३५ लाख रुपये घेतले होते. मात्र, पैसे घेऊन बराच कालावधी लोटला. तरीही नोकरी न मिळाल्याने संतोषने अनिलकडे पैसे परत मागितले. त्यावेळी अनिलने पैसे देण्यास टाळाटाळ केली असता संतोषला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. आपल्या मित्रानेच आपली फसवणूक केल्याने संतोष संतापला होता.

या रागातूनच त्याने कल्याण पश्चिमेच्या बिर्ला कॉलेज परिसरात टय़ुक्स लॉजमध्ये अनिलला बोलवून त्याच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात अनिलचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी संतोष हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. अनिल याने सरकारी नोकरी लावण्यासाठी ३५ लाख रुपये घेतले होते. मात्र नोकरीही लागली नाही, अनिल पैसेही देत नव्हता. त्यामुळे आपण हे कृत्य केल्याची कबुली संतोषने पोलिसांना दिली.

येवला-मनमाड मार्गावर अपघात, दोघे ठार

येवला : येवला-मनमाड महामार्गावर तीन वाहनांच्या अपघातात दोघे ठार, तर एकाची प्रकृती गंभीर आहे. कासारखेडा फाट्याजवळ हा विचित्र अपघात झाला असून न्याहारखेडे (ता.येवला) येथील मोटरसायकलवरील रमेश शिवाजी देवरे (25 ) व भागीनाथ सोपान मोरे (32) हे या अपघातात ठार झाले. या दोघांना उपचारासाठी तातडीने हलविण्यात आले. मात्र जबर मार लागल्याने दोघेही वाचू शकले नाही. भरधाव वेगाने चाललेल्या ट्रकने येवल्याच्या दिशेने येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली.

साखर कारखान्याच्या पाण्याच्या टाकीत पडून दोन कामगारांचा मृत्यू

या धडकेने मोटरसायकल जोरात समोरून येणाऱ्या स्विफ्ट कारला जाऊन धडकली. स्विफ्ट कारमध्ये एका कुटुंबातील तिघेजण असून त्यांना किरकोळ मार लागला. यातील प्रेरणा पाटील या तसेच ट्रकचा ड्रायव्हर-क्लीनर जखमी झाले आहेत. या अपघातात जखमी झालेल्यांना पुढील उपचारांसाठी दवाखान्यात हलविण्यात आले. अपघातग्रस्तांना राजेद्र शेलार, सागर गायकवाड, रामदास गायकवाड, अभिमन्यू जाधव आदींनी मदतीचा हात दिला. सदर अपघाताबाबत तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक देवीदास पाटील करीत आहेत.