PM मोदींनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर धावणार देशातील पहिली ड्रायव्हरलेस ट्रेन, जाणून घ्या वैशिष्ट्य

पोलिसनामा ऑनलाइन – Train News : भारतात परिवहन आणि वाहतूक क्षेत्रात एका नव्या युगाची सुरूवात आज सोमवारपासून होणार आहे. सोमवारी देशातील पहिल्या विनाचालक ट्रेन (first driverless train in india) ची सुरुवात होणार आहे. ज्यास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यासोबतच भारताचा सुद्धा जगातील त्या सात टक्के देशांमध्ये समावेश होईल जे विनाचालक संचलानाची सेवा देत आहेत. पीएम मोदी सोमवारी दिल्ली मेट्रोच्या मजेंटा लाइनवर भारताच्या पहिल्या चालकरहित ट्रेनसेवेचे उद्घाटन करतील.

कुठून कुठे धावणार ट्रेन
दिल्ली मेट्रोच्या मजेंटा लाइनवर चालणारी देशातील पहिली विनाचालक ट्रेन जनकपुरी पश्चिम-हून बोटेनिकल गार्डेनपर्यंत धावेल. ही ट्रेन 37 किलोमीटरचे अंतर पार करेल.

अत्याधुनिक सुविधायुक्त असणार
दिल्ली मेट्रोवर चालणारी देशातील पहिली विनाचालक ट्रेन अत्याधुनिक सुविधांनी युक्त असेल. ज्यामध्ये 6 कोच असतील. ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी आरामदायक प्रवासाकडे खास लक्ष देण्यात आले आहे.

पूर्णपणे स्वयंचलित असेल विनाचालक ट्रेन
दिल्ली मेट्रोने सांगितले की, विनाचालक ट्रेन पूर्णपणे स्वयंचलित आहेत, ज्यामध्ये मानवी हस्तक्षेप कमीत कमी असेल, तर मानवी त्रुटींच्या शंकासुद्धा कमी होतील. पिंक लाइनवर विनाचालक मेट्रो संचालन सुरू झाल्यानंतर नेटवर्क सुमारे 94 किलोमीटर होईल.

95 किमी प्रति तास होईल ट्रेनचा वेग
दिल्ली मेट्रोकडून सांगण्यात आले आहे की, स्वयंचलित ट्रेनचा कमाल वेग 95 किमी प्रति तास आणि सरासरी 85 किमी प्रति तास असेल. ट्रेनमध्ये विशेष ब्रेकिंग सिस्टम, एलईडी लायटिंग आणि एयर कंडीशनिंग सिस्टम लावण्यात आली आहे.

एकावेळी 2280 प्रवाशी करतील प्रवास
देशाच्या पहिल्या स्वयंचलित ट्रेनच्या प्रत्येक कोचमध्ये 380 प्रवाशी प्रवास करू शकतील. संपूर्ण ट्रेनबाबत बोलायचे तर सुमारे 2280 प्रवाशी एकावेळी प्रवास करू शकतील.

2021 मध्ये पिंक लाइनवर सुद्धा धावणार विनाचालक ट्रेन
मजेंटा लाइनवर जनकपुरी पश्चिमहून बोटेनिकल गार्डनदरम्यान विनाचालक मेट्रोसेवा सुरू झाल्यानंतर 57 किलोमीटरच्या पिंक लाइनवर मजलिस पार्क आणि शिव विहारच्या दरम्यान 2021 च्या मध्यापर्यंत विनाचालक मेट्रोसेवा सुरू केली जाईल.