Lockdown 3.0 : लंडनहून मुंबईत आलं पहिलं विमान, पुण्यातील 65 प्रवाशांचा समावेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण रोखण्यात आली होती. त्यामुळे गेली दीड महिना परदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना आणण्यासाठी वंदे भारत मिशन योजना आखण्यात आली आहे. त्याअंतर्गत ३२५ प्रवाशांना घेऊन लंडनहून एक विशेष विमान मुंबई विमानतळावर पहाटे दीड वाजता पोहचले आहे. या विमानातील प्रवांशांची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांना मुंबईतील विविध हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात येणार आहे. या विमानात पुण्यातील ६५ प्रवासी असून त्यांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या ६५ प्रवाशांना ४ बसमधून पुण्यात आणण्यात येत आहे. त्यांना पुणे महामार्गावरील बालेवाडी येथील सदानंद हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात येणार आहे.