माजी मंत्र्यांची मुलगी मिसेस इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातून प्रथम

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या आणि भोसरीतील शाहु शिक्षण संस्थेच्या विश्वस्त कोमल अजय साळुंखे (ढोबळे) यांनी दिल्ली येथे झालेल्या ‘मिसेस इंडिया – शी इज इंडिया’ या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक आणि राष्ट्रीय पातळीवर आठव्या क्रमांकाचा किताब पटकाविला आहे.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a652a081-8c38-11e8-960b-5bf43c9dfc68′]

फॅशन इंडस्ट्रीजमध्ये सोळा वर्षांचा अनुभव  असणाऱ्या डॅमसाई कंपनीने ’डॅमसाई मिसेस युनिव्हर्स मिसेस अर्थ’ अंतर्गत ‘मिसेस इंडिया – शी इज इंडिया’ ही स्पर्धा दिल्लीत हॉटेल द उमराव येथे आयोजित केली होती. तीन दिवस झालेल्या या स्पर्धेची अंतिम फेरी 14 जुलैच्या मध्यरात्री संपन्न झाली. या स्पर्धेत विवाहीत महिलांमध्ये असणाऱ्या कलागुणांना राष्ट्रीय व्यासपिठ उपलब्ध करुन दिले जाते.

या वर्षीच्या स्पर्धेचा ‘घरगुती हिंसा’ (डोमेस्टिक वायलेन्स) हा विषय होता. यातील अंतिम फेरीत देशभरातून पंच्चेचाळीस महिलांची निवड झाली होती. कोमल साळुंखे या महाराष्ट्र विभागातून प्रथम क्रमांक मिळवून राष्ट्रीय पातळीवर आठव्या किताबाच्या मानकरी ठरल्या. या स्पर्धेच्या एका फेरीमध्ये त्यांनी राजामाता जिजाऊ यांच्या वेषात महाराष्ट्राची तलवार बाजी सादर करुन उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या मुळेच महिला आज सर्वच क्षेत्रात सक्षमपणे ताठ मानेने उभ्या राहु शकत आहेत असे त्यांनी सांगितले.
[amazon_link asins=’B0756Z53JP’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ab67bdde-8c38-11e8-b16a-4f7fba4461e3′]

कोमल साळुंखे या माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या आहेत. त्या पुण्यासह महाराष्ट्रभर वसुंधरा वुमेन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून उद्योग व शिक्षण क्षेत्रात महिला सबलीकरणासाठी काम करीत आहेत. भोसरी, इंद्रायणीनगर येथील शाहु शिक्षण संस्थेच्या राणी पुतळाबाई वुमेन्स लॉ कॉलेजच्या माध्यमातून आता पर्यंत शेकडो युवती महिला कायद्याच्या पदवीधर झाल्या आहेत.