अक्षय कुमारने शेअर केली ‘केसरी’ चित्रपटाची पहिली झलक 

मुंबई : वृत्तसंस्था – अक्षय कुमारचा ‘केसरी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची पहिली झलक अक्षयनं आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर २१ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. पण त्या आधीच अक्षयनं चाहत्यांसाठी या चित्रपटाची पहिली झलक शेअर केली आहे. या व्हिडीओ मध्ये अक्षयने सारागढीच्या युद्धातील एक छोटसं दृश्य अक्षयनं शेअर केलं आहे.

‘यावेळी माझ्या मनात प्रचंड अभिमानाशिवाय इतर कोणतीच भावना नाही. या वर्षाची सुरुवात मी ‘केसरी’ ने करतोय. आतापर्यंतच्या माझ्या सर्वाधिक महत्त्वाकांक्षी चित्रपटासाठी मला तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांची गरज आहे’, असं लिहित महिन्याभरापूर्वी अक्षयनं केसरीचा पहिला पोस्टर प्रदर्शित केला होता.

अक्षयचा हा चित्रपट ३६ व्या शीख रेजिमेंटचे २१ सैनिक आणि दहा हजार अफगाण सैनिकांमध्ये झालेल्या सारागढीच्या युद्धावर आधारीत आहे आजपर्यंत सारागढीच्या युद्धाविषयी अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहे. भारतीय सैन्यदलाच्या इतिहासातही या युद्धाविषयी बरेच उल्लेख पाहायला मिळतात. आतापर्यंत लढलेलं हे इतिहासातील सर्वात धाडसी युद्ध होतं अशा शब्दात अक्षयनं या चित्रपटाचे कौतुक केलं आहे. या चित्रपटात अक्षयसोबत परीणिती चोप्राही दिसणार आहे. हा चित्रपट २१ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us