T-20 मधील पहिली ‘हॅट्रीक’, महिला काँग्रेसने BCCI ला दाखवून दिली ‘चूक’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बांगलादेशाविरुद्धात दीपक चाहर याने टी २० मध्ये ७ धावात ६ गडी बाद करुन एक विक्रम केला. त्याबरोबर त्याने हॅट्रीकही केली. बीसीसीआयने भारताकडून ही पहिली टी २० मधील हॅट्रीक असल्याचे जाहीर केले. मात्र, महिला काँग्रेसने जगातील सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या बीसीसीआय या संघटनेला त्यांची चुक दाखवून दिली आहे.

बीसीसीआयने एक ट्विट करत दीपकने भारताकडून टी २० मध्ये पहिली हॅट्रीक घेतल्याचे लिहिले होते. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनीही याच प्रकारचे ट्विट करुन दीपकचे अभिनंदन केले होते. या दोघांना महिला काँग्रेसने त्यांची चुक दाखवून दिली आहे.

टी २० क्रिकेटमध्ये भारताकडून एकता बिष्ट हिने पहिली हॅट्रीक घेतल्याचे दाखवून दिले आहे. एकता बिस्त हिने टी २० मध्ये २०१२ मध्ये पहिल्यादा हॅट्रीक घेतली असल्याचा बीसीसीआयने केलेला ट्विट पुरावा म्हणून समोर आणला आहे.

यावरुन बीसीसीआय ही महिला आणि पुरुषांमध्ये भेदाभेद करीत असल्याचे समोर आले आहे. महिलांनी केलेल्या विक्रमाकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे या प्रकारावरुन दिसून आले आहे. एकता बिष्ट हिने २०१२ मध्ये वूमन वर्ल्ड कप टी २० मध्ये श्रीलंकाविरुद्धच्या सामन्यात हॅट्रीक केली होती. डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करणाऱ्या एकताने श्रीलंकेच्या शेवटच्या षटकात चार महिला फलंदाजांना बाद केले होते. एकताने तिघींना लागोपाठ बाद करुन हॅट्रीक केली. त्यानंतर त्याच षटकात एका फलंदाजाला धावबाद केले होते.

उत्तराखंडच्या एकताने २३ जून २०११ रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी २० मधून आंतरराष्ट्रीय किक्रेटमध्ये पर्दापण केले होते.

Visit : Policenama.com