कौतुकास्पद ! ‘मोटरस्पोर्ट्स’मध्ये ‘विश्व’कप जिंकणारी भारतातील पहिलीच महिला ‘ऐश्वर्या’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्या खेळात भारतीय खेळाडूंची कमी भासते त्या खेळात भारताच्या एका महिलेने उल्लेखनीय यश मिळवले आहेत. हा खेळ आहे मोटरस्पोर्ट्स. या खेळात शानदार कामगिरी करत भारताच्या २३ वर्षीय महिला खेळाडूने वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला आहे. बेंगळुरुच्या ऐश्वर्या पिस्सायने मोटरस्पोर्ट्सच्या खेळात वर्ल्ड कप जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली.

ही अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या ऐश्वर्याचा २०१७ मध्ये अपघात झाला होता, त्यानंतर या धक्कादायक परिस्थितीतून सावरत तिने ही उल्लेखनीय कामगिरी केली. यावर बोलताना ऐश्वर्या म्हणाली की भारताला या प्रकारात विजेतेपद मिळवून देणं अभिमानास्पद आहे. ज्यूनिअर कॅटेगरीत तिने दुसरे स्थान पटकावले होते.

दुबईत झालेल्या पहिल्या फेरीत ऐश्वर्याने यश मिळले होते. त्यानंतर पोर्तुगालमध्ये ३ रे, स्पेनमध्ये ५ वे, तर हंगेरीत ४ थे स्थान पटकावलेल्या ऐश्वर्याने स्पर्धेत ६५ गुण पटकावले. हंगेरीत सहभागी होण्याआधी ऐश्वर्या आणि व्हिएरा यांच्यात हा सामना रंगला होता. हंगेरीत ऐश्वर्याने १३ गुण मिळवले तर व्हिएरानं १६ गुण मिळवले. मात्र, आधीच्या टप्प्यात मिळवलेल्या गुणांचा फायदा ऐश्वर्याला झाल्याने तिला या स्पर्धेत यश मिळवणे सोपे झाले. FIM वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद पटकावणारी ऐश्वर्या पहिलीच भारतीय महिला आहे.

आरोग्यविषयक वृत्त