Coronavirus : कडक सॅल्यूट ! ‘कोरोना’ विरूध्दच्या लढ्यात राष्ट्रपती कोविंद यांच्या पत्नी मैदानात, स्वतःच शिवतायेत गरिबांसाठी ‘मास्क’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना संसर्गाने संपूर्ण जगाला विळखा घातल्यामुळे जग जणू थांबले आहे. सर्वच जण कोरोना संसर्गा विरुद्ध चालेल्या या लढाईमध्ये आपाल्यापरीने योगदान देत आहे. अशावेळीच, भारताच्या राष्ट्रपतीं यांच्या पत्नी आणि देशाच्या प्रथम महिला सविता कोविंद या सुद्धा कोरोना संसर्गाविरुद्ध सुरु असलेल्या या लढाईसाठी मैदानात उतरल्या आहे. त्या स्वतः गरीब लोकांसाठी मास्क शिवत आहे.

प्रेसिडेंट इस्टेट येथील शक्ती हाट येथे त्यांनी स्वतःच्या हाताने मास्क शिवून कोरोना संसर्गाचा धैर्याने सामना करण्याचा संदेश देत प्रथम महिला सविता कोविंद यांनी बुधवारी कोरोना विरोधातील लढाईत आपले योगदान दिले. त्यांच्या या योगदानातून, वैश्विक आणि राष्ट्रीय संकटांचा सामना एकत्र येऊनच केला जाऊ शकतो, हा संदेशही लोकांपर्यंत गेला. तर येथे शिवण्यात आलेले मास्क दिल्ली अर्बन शेल्टर इंप्रुव्हमेंट बोर्डाच्या विविध शेल्टर होम्सना वितरित केले जाणार आहे.

देशातील कोरोना संसर्ग स्थिती

देशात गेल्या २४ तासांत १४८६ नवे रुग्ण आढळले आहे. तर ४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्ण संख्या २१ हजार ३९३ झाली आहे, त्यापैकी ४२५७ जण बरे होऊन घरी परतले आहे. तर ६८१ जणांचा मृत्यू कोरोना संसर्गाने झाला आहे. देशात कोरोना संसर्गाचा प्रसार वाढत असला तरी इतर देशांच्या तुलनेत आपण कोरोना संसर्ग बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू दिली नसल्याचा दावा केंद्रीय मंत्रालयाने केला.

संपूर्ण जग करत आहे कोरोनाचा सामना

जगभरात कोरोना संसर्गाचे आतापर्यंत २६ लाख २८ हजार ५२७ रुग्ण झाले आहे. तर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ८३ हजार ४२४ झाली असून आतापर्यंत जगात ७ लाख ८४ हजार ९८६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग जगात मोठ्या प्रमाणात पसरत असून जगभरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वच देश कोरोना संसर्गाशी युद्धस्तरावर सामना करत आहे.