‘राष्ट्रवादी’च्या उमेदवारांची पहिली यादी 2 ऑक्टोबरला !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी देखील आपली उमेदवारांची यादी जाहीर करेल अशी शक्यता होती. मात्र आज राष्ट्रवादीची यादी जाहीर झाली नाही. राष्ट्रवादी आपली उमेदवारांची यादी 2 ऑक्टोबरला जाहीर करणार आहे. आजच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी ही माहिती दिली.
अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी आपली उमेदवारांची यादी येत्या 2 ऑक्टोबरला म्हणजेच गांधी जयंतीला जाहीर करेल.

राज्यात विधानसभेमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप सेनेत युती होईल असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. परंतू अजून ही अधिकृत घोषणा झाली नाही. तर काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर देखील केली आहे.

सुरुवात त्यांनी केली शेवट आम्ही करणार
राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी युती होण्याआधीच झाली आहे. भारत भालके यांचा भाजप प्रवेश अडून राहिल्यानंतर यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला. दौलत दरोडा यांनी देखील आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी पक्षाच्या उमेदवारीची घोषणा 2 तारखेला होणार असे सांगत अजित पवारांना भाजपला टोला मारला. यावेळी अजित पवार म्हणाले की आता काट्याने काटा काढायचा आहे, सुरुवात त्यांनी केली शेवटी आम्ही करणार.

Visit : policenama.com