अभिनेत्री खा. नुसरत जहाँनी शेअर बंगाली सिनेमातील फर्स्ट लुक !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बंगाली अ‍ॅक्ट्रेस आणि टीएमसी खासदार नुसरत जहाँ आपल्या फोटो आणि व्हिडीओंमुळं कायमच चर्चेत येताना दिसत असतात. सोशलवर त्या कायमच चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतात. पुन्हा एकदा आपल्या फोटोनं त्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

नुसरत यांनी त्यांच्या इंस्टारून एक केला आहे. या फोटोत त्या साडीवाल्या लुकमध्ये दिसत आहे. सध्या त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.

नुसरत यांचा हा लुक त्यांच्या आगामी सिनेमातील आहे. डिक्शनरी असं या आगामी सिनेमाचं नाव आहे. हा एक बंगाली सिनेमा आहे. या सिनेमातील त्यांचा हा फर्स्ट लुक आहे.

नुसरत यांचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी त्यांच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी त्यांच्या या लुक आणि सौंदर्यचं कौतुक केलं आहे.

नुसरत यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुसरत जहां यांनी बंगाली सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करत स्वत:ची जागा तयार केली आहे. अनेक सिनेमातून आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱ्या नुसरत यांनी शोत्रु या सिनेमातून सिनेजगतात पाऊल टाकलं. 2011 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. खोका 420, जमाई 420, खिलाडी, क्रिसक्रॉस, नकाब, लव्ह एक्प्रप्रेस अशा सिनेमात नुसरत यांनी काम केलं आहे. आता लवकरच त्या डिक्शनरी सिनेमाम करताना दिसणार आहेत.