‘स्त्री’ चा फर्स्ट लूक रिलीज , श्रद्धा कपूर भयानक रूपात   

 मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन


अभिनेत्री श्रद्धा कपूरला तुम्ही नेहमी सुंदर सोज्वळ  तरुणीच्या भूमिकेत पाहिले आहे. पण आता श्रद्धा नव्या रूपात भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे ती हॉरर  ननच्या  रूपात दिसणार आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार यांचा सिनेमा “स्त्री” चा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या फर्स्ट लूक मध्ये श्रद्धा नन च्या ड्रेसमध्ये दिसते आहे.
[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4b8b3a83-8ccd-11e8-bd2b-1dc78e040a00′]

या सिनेमाचा टिझर आणि फर्स्ट लूक पाहता या सिनेमातील श्रद्धाचा हा लूक हॉलीवूडचा सिनेमा ‘कंज्यूरिंग सी’ प्रेरित असल्यासारखे वाटते. कंज्यूरिंग सी सिरीजचा आगामी सिनेमा ‘द नन’ रिलीज होणार आहे.  या सिनेमातली अभिनेत्रीसुद्धा अशाच अंदाजात ननचा ड्रेस घालून दिसतेय. आगामी स्त्री सिनेमात श्रद्धा भुताच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे तर राजकुमार राव पिडीताच्या भूमिकेत दिसणार आहे असा एकंदर अंदाज सिनेमाचा टिझर बघून लावण्यात येतो आहे.

या सिनेमाचे लेखन, राज आणि डिकेने यांनी केले आहे. निर्मिती डिनेश विजन, राज आणि डीके करणार आहेत. राज आणि डिके यांनी शोर इन द सिटी, गो गोआ गॉन आणि हॅप्पी एंडिंग सारख्या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. पहिल्यांदाच राजकुमार श्रद्धासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. ३१ ऑगस्टला श्रद्धा आणि राजकुमार राव प्रेक्षकांना घाबरवायला आणि हसावायला येणार आहेत.
[amazon_link asins=’B07CKPLGDT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’55429077-8ccd-11e8-a58a-b75fee3ea111′]

श्रद्धाचे येऊ घातलेले काही सिनेमे

श्रद्धा ‘स्त्री’ शिवाय सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे तसेच ती ‘बत्ती गुल मीटर चालू’ आणि ‘साहो’ मध्ये सुद्धा झळकणार आहे. तर राजकुमार रावबाबत बोलयाचे झाले तर  ‘क्वीन’ नंतर पुन्हा एकदा कंगना राणौत साेबत ताे स्क्रिन शेअर करतोय. सध्या तो ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

या सिनेमाचा टिझर यापूर्वीच रिलीज झाला आहे. या टिझर वरून हा सिनेमा हॉरर आहे असे वाटते आहे. पण हा सिनेमा फक्त हॉरर सिनेमा नसून कॉमेडी हॉरर सिनेमा आहे.

If dare then see the movie, guess who she in horrible look? | हिम्मत असेल तरच बघा, ही अभिनेत्री दिसणार भयानकरुपात ओळख पाहु कोण?