500 पैकी 499 गुण मिळवत, चार विद्यार्थी CBSE बोर्डात प्रथम!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, या निकालाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट म्हणजे 500 पैकी 499 मार्क मिळवत एक नव्हे तर तब्बल चार विद्यार्थ्यांनी बोर्डात बाजी मारली आहे. या चार विद्यार्थ्यांमध्ये तीन मुलीं प्रथम क्रमावर आहे. यामध्ये डीपीएस गुरुग्राम शाळेची प्रखर मित्तल, आरपी पब्लिक स्कूलची रिमझिम अग्रवाल, नंदिनी गर्ग (शामली), आणि भवानी विद्यालय कोच्ची ची श्रीलक्ष्मी यांनी 499 गुण मिळवत प्रथम क्रमांकावर बाजी मारली आहे.

निकालात मुलींनी मारली बाजीः
यावर्षीच्या निकाल मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षीचा दहावीचा निकाल 86.70 टक्के लागला असून, यावर्षी देखील मुलींनी निकालात बाजी मारली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मुलींचा निकाल मुलांपेक्षा 3.35 टक्क्यांनी जास्त लागला आहे.

निकालामध्ये त्रिवेंद्रम विभाग प्रथम क्रमांकावरः
निकालामध्ये यावर्षी 99.60 टक्क्यांसह त्रिवेंद्रम विभागाने पहिल्या क्रमांकावर बाजी मारली आहे. तर चेन्नई 97.37 टक्क्यांसह दुसरं आणि अजमेर 91.86 टक्क्यासंह तिसरं स्थान पटकावलं आहे.

या ठिकाणी पाहता येणार निकालः
विद्यार्थ्यांना या परीक्षेचा निकाल सीबीएसईच्या cbse.nic.in या अधिकृत वेबसाईटसह cbseresults.nic.in, results.nic.in आणि results.gov.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.