Coronavirus : चीनच्या ‘बदनाम’ सी-फूड मार्केटच्या पहिल्या ‘कोरोना’ रूग्णानं ‘असा’ पसरवला होता ‘व्हायरस’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –  चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने जगभरात उच्छाद मांडला आहे. शनिवारी दुपारपर्यंत जगभरात 6 लाखाहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली असून यामुळे 27,800 पेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. दरम्यान, चीनच्या वुहानमधील सी फूड मार्केटमधून कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याचे समजते. माहितीनुसार, वुहान सी फूड मार्केटमधील कोरोना विषाणू चाचणीत वेई नावाची महिला प्रथम सकारात्मक होती. महिला चिनी बाजारात जिवंत कोळंबी विकत असत.

वेई गुइजियान (57) नावाची ही महिला सी फूड मार्केटपासून 500 मीटर अंतरावर भाड्याच्या घरात राहत होती. या महिलेला 11 डिसेंबरला ताप आल्याचे समजते. तिला वाटले कि, हंगामी फ्लू आहे आणि ती एका लहान क्लिनिकमध्ये गेली. पण इंजेक्शन देऊनही तिला दिलासा मिळाला नाही. पण ती बाजारात वस्तूंची विक्री करत राहिली. पाच दिवसानंतर, प्रकृती बिघडल्यावर ती एका मोठ्या रुग्णालयात गेली.

वेई म्हणाली, मला थकवा जाणवत होता, पण हा गेल्यावर्षीसारखा नव्हता. प्रत्येक हिवाळ्यामध्ये मला फ्लू होतो, म्हणून मला वाटले की हा फ्लू आहे. चीनच्या रोग नियंत्रण केंद्राने सांगितले की, सी फूड मार्केटमध्ये विकल्या जाणाऱ्या प्राण्यांपासूनच मानवाला कोरोना विषाणूची लागण झाली होती. महिलेने सांगितले की, आजारी पडल्यानंतरही ती बाजारात विक्रीसाठी जात असे. यामुळे अनेक लोक या महिलेच्या संपर्कात आले. यांनतर ती एलेव्हन्थ हॉस्पिटल ऑफ वुहानमध्ये दाखल झाली. पण तिला कोणती समस्या आहे हे डॉक्टरांना कळू शकले नाही. यानंतर, 16 डिसेंबर रोजी ती वुहान युनियन या मोठ्या रुग्णालयात गेली. तेथील डॉक्टरांनी सांगितले की, बऱ्याच रूग्णांना अशाच प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याच वेळी, उपचारानंतर वेई बरी झाली.

कोरोना व्हायरसचे प्रमाण वाढल्यानंतर चीन सरकारने वुहानचे सी फूड मार्केट बंद केले होते. त्याच वेळी, कोरोना विषाणूचा पेशंट झिरो (कोणत्याही रोगाचा पहिला रुग्ण) बद्दलचे रहस्य अद्यापपर्यंत कायम आहे. चीनने कोरोना विषाणूच्या पेशंट झिरोबद्दल अधिकृतपणे स्पष्ट माहिती दिलेली नाही. माध्यमांमध्ये लीक झालेली कागदपत्रे आणि चीन सरकारच्या दाव्यामध्ये फरक आहे.

सी फूड मार्केटची पहिली कोरोना व्हायरस रुग्ण जिथे वेई होती. त्याचवेळी, चीनमधील कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण म्हणून 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीचा उल्लेख केला जातो. माहितीनुसार, 1 डिसेंबर रोजीच काही लक्षणे दिसू लागली होती आणि हे सी फूड मार्केटशी संबंधित नव्हते. त्याच वेळी, साउथ चायना मॉर्निंग पोस्टने सरकारी कागदपत्रांच्या आधारे म्हटले होते की कोरोना विषाणूची पहिली घटना 17 नोव्हेंबरला उघडकीस आली होती. पण चिनी अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोनाचा पहिला रुग्ण, 7 डिसेंबर रोजी आजारी पडला होता.