ट्रीटमेंट नंतर इरफान भारतात परतला, पहा त्याची पहिली झलक 

मुंबई : वृत्तसंस्था – लंडन मध्ये आठ महिने न्युरोएंडोक्राईन कॅन्सर या आजारावर उपचार घेतल्यानंतर अभिनेता इरफान खान भारतात परतला आहे. आज सकाळी इरफान खान मुंबई विमानतळावर दिसला आहे. लवकरच तो हिंदी मीडियम या चित्रपटाच्या शूटींगला सुरूवात करणार आहे.

फोटोग्राफर्सने त्याचे फोटो काढू नयेत यासाठी इरफानने त्याचा चेहरा झाकला होता. यावेळी इरफानने पांढऱ्या रंगाचा शर्ट, कॅमोफ्लेग पँट आणि त्यावर गुलाबी रंगाचा कोट घातलेला होता. तसेच त्याने एक छानशी हॅट घातली होती.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात इरफान ‘हिंदी मीडियम’ चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात करणार आहे. काही दिवसापूर्वी हिंदी मीडियमच्या मेकर्सनी लंडनला जाऊन इरफानला ‘हिंदी मीडियम २’ची स्क्रिप्ट ऐकवली होती. ही स्क्रिप्ट आवडल्यामुळे इरफानने त्यात काम करण्यास होकार दिला होता.

इरफानच्या कॅन्सरचे निदान होण्यापूर्वीच २०१८ मध्ये ‘हिंदी मीडियम’ चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा झाली होती. पण इरफानची प्रकृती खराब झाल्यामुळे हा चित्रपट लांबणीवर पडला. आता लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरु होणार असून होमी अदजानिया हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे.

२०१७ साली ‘हिंदी मीडियम’ चित्रपट रिलीज झाला होता. हा देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा चित्रपट होता. यातील इरफानच्या अभिनयाचही प्रचंड कौतुक झालं होत. इरफान सोबत याचित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री सबा कामर चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली होती. आता पुन्हा इरफानचे चाहते त्याच्या बॉलिवूडमधील कमबॅकची आतुरतेने वाट पाहात आहेत.

साराचा १४ वर्षांपूर्वीचा ‘तो’ व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल

अरबाजच्या ‘त्या’ प्रश्नावर सनी लिओनी रडू लागली

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like