रणवीर-दीपिकाच्या विवाहाचे फोटो तुम्ही पाहिलेत का ?

इटली : वृत्तसंस्था – इटलीतील लेक कोमो इथल्या नयनरम्य व्हिलामध्ये अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचा बुधवारी पारंपरिक कोंकणी पद्धतीने विवाह संपन्न झाला. या विवाहाचे काही फोटो समोर आले आहेत. मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत राजेशाही थाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला. अनेकांना त्यांच्या लग्नाच्या फोटो आणि व्हिडीआेची उत्सुकता लागलेली आहे. अशातच त्यांचे काही फोटो समोर आले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून लग्नातल्या इतर विधींना सुरुवात झाली आणि मंगळवारी कोंकणी पद्धतीनेच दीप-वीरचा साखरपुडा झाला. लग्नाच्या पार्श्वभूमीवर लेक कोमो परिसरात कडेकोड सुरक्षाव्यवस्था असून मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत राजेशाही थाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला.
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये या लग्नाची जोरदार चर्चा आहे. कोंकणी पद्धतीने विवाह संपन्न झाल्यानंतर उद्या (गुरुवारी) सिंधी पद्धतीने दीप- वीर विवाहबद्ध होणार आहेत. या सोहळ्यातील कोणतेही फोटो सोशल मीडियावर अपलोड न करण्याची अट रणवीर आणि दीपिकानं पाहुण्यांना ठेवली असल्याचं समजत आहे. मंगळवारी दीप- वीरच्या संगीत समारंभासाठी गायिका हर्षदीप कौरला आमंत्रित करण्यात आलं होतं.
हर्षदीपने एकाहून एक दमदार गाणी सादर करत या समारंभात चार चाँद लावले. जे लग्नासाठी इटलीत उपस्थिती राहणार नाही त्यांच्यासाठी मुंबईत जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. २८ नोव्हेंबरला मुंबईतील ग्रँट हयात या आलिशान ठिकाणी दीप-वीरची रिसेप्शन पार्टी असणार आहे. या पार्टीसाठी संपूर्ण बॉलिवूडला आमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे या रिसेप्शन पार्टीत बॉलिवूडमधल्या बड्या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार हे नक्की.