‘पुणे-मुंबई’नंतर आता नागपूरमध्ये पहिला ‘कोरोना’ बाधित ‘रुग्ण’, राज्यातील संख्या 11 वर

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात हैदोस घातल्यानंतर आता नागपूर या उपराजधानीतही कोरोना विषाणूची लागण झालेला रुग्ण आढळून आला आहे.  त्यामुळे आता राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ११वर पोहचली आहे. या रुग्णाला नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा रुग्ण ३ दिवसांपूर्वी अमेरिकेहून नागपूरात आला होता. त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निदान झाले आहे.

या रुग्णाचा गेल्या ३ दिवसांमध्ये ज्या लोकांशी संपर्क झाला, त्यांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अशा लोकांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच त्यांच्यात लक्षणे आढळून आली नाही तरी त्यांनी घरी विश्रांती घ्यावी, अशा सूचना दिल्या जात आहे.

राज्यात पुण्यात सर्वाधिक ८ कोरोना बाधित रुग्ण असून मुंबईत २ रुग्ण आहेत. राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ११ झाली असली तर त्या सर्वांची प्रकृती उत्तम आहे. ते गंभीर नाहीत.