आता ‘कोरोना’ला न घाबरता करा ट्रेनमधून प्रवास, रेल्वेनं तयार केलाय ‘पोस्ट कोविड कोच’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात सुरक्षितपणे कसा प्रवास करता येईल यासाठी रेल्वे विविध प्रयत्नांमध्ये गुंतलेली आहे. या दरम्यान रेल्वेने एक असा रेल्वेचा डबा शोधून काढला आहे ज्यात प्रवासादरम्यान व्हायरसचा प्रादुर्भाव टाळता येतो. प्रवाशांना या संसर्गापासून कसे वाचवायचे हे ध्यानात ठेवून हा रेल्वे डबा तयार करण्यात आला आहे.

यात अशा सुविधा आहेत त्यांचा वापर स्पर्श न करता केला जाऊ शकतो. डब्यात चढण्यासाठी असलेली रेलिंग आणि दरवाजा उघडण्यासाठी जी चिटकनी आहे त्यास कॉपर कोटेड बनवण्यात आले आहे. एवढेच नाही तर या वातानुकूलित डब्यामध्ये प्लाझ्मा एअर प्यूरिफायर बसविण्यात आले आहे, यामुळे व्हायरसचा प्रादुर्भाव रोखता येतो. सीट वर टायटॅनियम डाई ऑक्साईड कोटिंग करण्यात आले आहे.

तज्ञांचा असा विश्वास आहे की कोरोना साथीचा आजार इतका पसरला आहे की आता त्यासोबत जगण्याची सवय लावावी लागेल. संपूर्ण जगभरात याचा कहर सुरूच आहे. अशा परिस्थितीत या साथीला बळी न पडता कसे कार्य करावे यावर बरीच तंत्रे विकसित केली जात आहेत. या दरम्यान पंजाब स्थित कपूरथला कोच फॅक्टरीने पोस्ट कोविड कोच तयार केले आहे. कारण जोपर्यंत लस तयार होत नाही तोपर्यंत न घाबरता आणि संसर्ग टाळून आवश्यक प्रवास केला जाऊ शकतो. या पोस्ट कोविड कोच ला कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी डिझाइन केलेले आहे. यात अशा सुविधा आहेत ज्यांना स्पर्श न करताच कार्य केले जाऊ शकते.

पाण्याच्या नळाला आणि सोप डिस्पेंसरला पायांनी चालवण्याची सुविधा आहे, म्हणजेच हाताने स्पर्श करण्याची गरज नाही. तसेच टॉयलेटचा दरवाजा, फ्लश वाल्व्ह, दरवाजाला बंद आणि उघडण्याची चिटकनी, वॉशबेसिनच्या नळाला कॉपर कोटिंग करण्यात आले आहे. असा विश्वास आहे की विषाणू कॉपरवर बराच काळ टिकू शकत नाही आणि तो नष्ट होतो किंवा खाली पडतो. कॉपरमध्ये अँटी-मायक्रोबियल गुणवत्ता असते. म्हणूनच, कोच च्या वॉशबेसिन, लॅव्हेटरी, सीट आणि बर्थ, जेवणाचे टेबल, ग्लास विंडो आणि फर्शसह त्या जागेचे कोटिंग केले गेले आहे जे मनुष्यांच्या संपर्कात येऊ शकते. ही कोटिंग एका वर्षांपर्यंत खराब होत नाही.

पोस्ट कोविड कोचच्या एसीमध्येच प्लाझ्मा वायु शुद्धिकरण स्थापित केले आहे. हे उपकरण एसी कोचमध्ये हवा आणि पृष्ठभाग दूषिततेपासून मुक्त ठेवते. संपूर्ण कोच आणि सीट टायटॅनियम डायऑक्साईडने कोटिंग आहे. हे पर्यावरणास अनुकूल वाटर वेस्ड कोटिंग आहे. या कोटिंगमुळे व्हायरस, बॅक्टेरिया नष्ट होतात. हे मानवी शरीरावर हानी करत नाही. हे नॉन-टॉक्सिक आहे आणि अमेरिकन अन्न व औषध प्रशासनाने प्रमाणित केले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा कोच तयार करण्यासाठी 6-7 लाख रुपये खर्च येतो. जुन्या कोचमध्येच या प्रकारची व्यवस्था केली गेली आहे.