पहिल्या टप्प्यात यांच्यात रंगणार लढत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाने १८२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातून १६ उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. या १६ उमेदवारांपैकी १४ उमेदवार हे विद्यमान खासदार असून दोन नवख्या उमेदवारांना संधी मिळाली आहे.

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघातून भाजपने नितीन गडकरी यांना उमेदावीर दिली आहे. तर त्यांच्या विरोधात भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले नाना पाटोले यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदार संघात कोण बाजी मारेल याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. तर जालना लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून अर्जुन खोतकर हे निवडणूक लढवण्यास ईच्छूक होते. परंतु त्यांची समजूत काढून या मतदार संघातून रावसाहेब दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हा मतदार संघ काँग्रेसकडे असून या ठिकाणीचा उमेदवार जाहीर करण्यात आला नाही.

बीडमधून प्रितम मुंडे यांचीही उमेदवारी कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असून भाजपाने राष्ट्रवादीला ‘प्रितमच पुन्हा’ असल्याचे ठामपणे सांगितलं आहे. बीड मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसकडू बजरंग सोनावणे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार असला तरी मुंडे विरुद्ध मुंडे असाच खरा समाना रंगणार आहे.

नंदुरबार मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. काँग्रेसने या मतदार संघातून के.सी पडवी यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने हीना गावीत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. गावित यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नंदुरबार मतदारसंघामधून काँग्रेसचे माणिकराव गावित यांचा १ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला. २६ वर्षे वय असलेल्या व पेशाने  डॉक्टर असणाऱ्या गावित या १६व्या लोकसभेमधील सर्वात तरूण खासदार होत्या.

धुळे लोकसभा मतदार संघातून काँग्रेसने कुणाल रोहिदास पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या विरोधात भाजपने सुभाष भामरे यांना उमेदवारी दिली आहे. भामरे हे २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या धुळे मतदारसंघातून निवडून आले आहेत. २०१४ च्या निवडणूकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अमरिश पटेल यांचा १ लाख ३० हजार ७२३ मतांनी पराभव केला होता.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून आमदार संग्राम जगताप यांना रिगणात उतरविण्यात आले आहे. भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्याशी आमदार संग्राम जगताप यांचा थेट सामना होणार आहे.

त्याचप्रमाणे मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात भाजपच्या पुनम महाजन विरुद्ध काँग्रेसच्या प्रिया दत्त आणि वर्धा मदतदार संघात काँग्रेसच्या चारुलता टोकस विरुद्ध भाजपचे रामदास तडस यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like