5 उपमुख्यमंत्री आणि 3 राजधानी असलेलं ‘हे’ राज्य बनलं देशातील पहिलं

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – पाच उपमुख्यमंत्री असलेले राज्य म्हणून आगळा वेगळा लौकिक असलेल्या आंध्र प्रदेशाने आता त्यांच्या राज्यातील तीन शहरांना राजधानीचा दर्जा देण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर केला आहे. तीन राजधानी असलेले आंध्र प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. देशात यापूर्वी दोन राजधानी असलेली राज्ये आहेत. मात्र, तीन राजधानी असलेले आंध्र प्रदेश हे पहिले राज्य आहे.

अमरावती ही विधायक राजधानी, विशाखापट्टणम ही कार्यकारी राजधानी आणि कुरनूल ही न्यायिक राजधानी होणार आहे. आंध्र प्रदेशातून तेलंगणा हे नवीन राज्य निर्माण करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशची राजधानी असलेले हैदराबाद हे राजधानीचे शहर तेलंगणामध्ये समाविष्ट करण्यात आले. आंध्र प्रदेशसाठी अमरावती येथे नवीन राजधानीचे शहर वसविले जात आहे.

याबाबत मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी सांगितले की, आम्ही विकेंद्रीकरणावर लक्ष केंद्रित करुन ऐतिहासिक चुका सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही राजधानीत बदल केला नाही तर फक्त आणखी दोन नवीन राजधानीची शहरे जोडली आहे. राज्यातील कोणत्याही क्षेत्रावर अन्याय करणार नाही.
विधानसभेत या विधेयकाला विरोध करणाऱ्या तेलगु देशमच्या १७ आमदारांना निलंबित केल्यानंतर हे विधेयक मंजूर करण्यात आले.

फेसबुक पेज लाईक करा –