‘या’ अभिनेत्रीचा वयाच्या 60 व्या वर्षी बॉयफ्रेंडबद्दल धक्कादायक खुलासा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बधाई हो फेम बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्तानं खासगी आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. तिच्यावरही अत्याचार झाल्याचं तिनं सांगितलं आहे. इतकंच नाही तर तिच्या बॉयफ्रेंडनंही तिची फसवणूक केली आहे असंही तिनं सांगितलं आहे. एका मुलाखतीत बोलत असताना नीनानं खासगी आयुष्याबद्दल काही खुलासे केले आहेत.

मुलाखतीत बोलताना नीना गुप्ता म्हणाली, “आज माझी ओळख जरी खंबीर स्त्री म्हणून असली तरी मीदेखील कधीकाळी अन्याय सहन केला आहे. माझ्यावरही अत्याचार झाले आहेत. माझ्या प्रियकरानं माझी फसवणूक केली होती. त्यानं माझा खूप छळ केला होता. मला शिवीगाळ करत मारहाणही केली होती.” असं नीना गुप्तानं सांगितलं आहे.

80 च्या दशकात नीना गुप्तानं वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्सच्या मुलीला जन्म देण्याचा निर्णय घेतला. नीना आणि विवियन यांचं लग्न झालं नसल्यानं मुलीला जन्म देण्याच्या निर्णयानं तिची बरीच चर्चा झाली. परंतु स्वतंत्र विचाराची नीना आपल्या निर्णयावर ठाम राहिली. त्या काळात असा निर्णय घेणं म्हणजे हे एक क्रांतिकारी पाऊल होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

वयाची साठी ओलांडली असली तरी आजही नीना सिनेमात काम करते. अनेकदा ती बोल्ड आणि बिंधास्त अंदाजात फोटो शेअर करताना दिसते. नीनाच्या मुलीचं नाव मसाबा गुप्ता आहे. मसाबा एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर असून फॅशन इंडस्ट्रीत तिचं मोठं नाव आहे.