खुशखबर ! ‘पतंजली’चं ग्राहकांना मोठं ‘गिफ्ट’, अनेक वस्तूंवर ५० टक्के ‘सूट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही पतंजलीची उत्पादने वापरत असाल तर तुमची चांदी होणार आहे. कारण पतंजली आपल्या उप्तादनांवर तब्बल ५० टक्के सूट देणार आहे. FMCG कंपन्याना टक्कर देण्यासाठी बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने पहिल्यांदाच काही उत्पादनांवर भले मोठे डिस्काऊंट आणले आहे. यामागे पतंजलीची विक्री वाढवण्याचा मानस आहे.

पतंजली या विशेष ऑफरमध्ये Buy ३, Get ३ free म्हणजेच ३ वर ३ मोफत ही ऑफर आणणार आहे तर काही खास वस्तूवर ५० टक्के सूट देणार आहे.

‘या’ सामनावर असेल कॅशबॅक आणि डिस्काऊंट
पदार्थांमध्ये ज्यूस, पीठ, तेल, ओट्स आणि रेडी टू इट फूड्सचा समावेश असेल. याशिवाय शॅम्पू, फेसवॉश जेसे की पर्सनल केअर उत्पादनावर कॉम्बो ऑफर देण्यात आली आहे. असे असले तरी या ऑफर्सचा फायदा काही शहरातील लोकांना होणार आहे.

मागील दोन वर्षांपासून कंपनीच्या विक्रीत मंदी
कंपनी मागील दोन वर्षांपासून विक्रीत कमी आल्याने त्रस्त आहे. कंपनीना एक्सपायर्ड उत्पादनाचे देखील नुकसान सोसावे लागले आहे. मागील दोन वर्षांपासून पतंजलीची विक्री कमी झाली आहे. २०१७ च्या तुलनेत २०१८ साली कंपनीला १० टक्के तोट्याला सामोरे जावे लागले आहे.

लवकरच सुधारेल स्थिती
पतंजलीचे एमडी आचार्य बालकृष्ण यांनी सांगितले की, यावेळी कंपनीला नुकसान होत आहे आणि त्याची प्रगतीही कमी आहे. ग्रामीण भागात स्लोडाऊन मुळे विक्री घटली आहे. स्लोडाऊनचे प्रमाण हळू हळू कमी होईल. तर हर्बल आणि नॅचरल वस्तूची मागणी वाढली आहे आणि खप देखील वाढत आहे.

परंतू पतंजलीच्या उत्पादनावर मोठी सूट मिळणार असल्याने याचा फायदा ग्राहकांना निश्चित होणार आहे. त्यातूनच कंपनीची विक्री वाढण्याची शक्यता आहे.

शाळकरी मुलांच्या आरोग्यासाठी डबेवाल्यांचा पुढाकार

मुंबईत जून महिन्यात हेपेटायटिसच्या रूग्णांची संख्या वाढली

मुख्यमंत्र्यांची आमदारकी धोक्यात ? २३ जुलै ला फैसला !

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like