‘त्या’ ड्रेसमुळं झाली करीना कपूरची डोकेदुखी, भर कार्यक्रमातच…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – इव्हेंट कोणताही असो सेलेब्रिटीज नेहमीच वेगळी स्टाईल आणि फॅशन करत असतात. अनेकदा त्यांच्या या आगळ्या वेगळ्या फॅशनच्या नादात ते उप्स मूमेंटची शिकार होतात किंवा आपल्याच फॅशनमुळे त्यांना अवघडल्या सारखं होतं. बॉलिवूड स्टार करीना कपूरसोबतही असंच काहीसं झालं आहे. करीनाला फॅशनसाठी अनेकजण फॉलो करतात. अनेकदा ती वेगवेगळी स्टाईल करताना दिसत असते.

https://youtu.be/wYcMFHxpUmE

नुकताच करीनाच्या गुड न्यूज या आगामी सिनेमाचा ट्रेलर लाँचिंग कार्यक्रम झाला. यावेळी ती ग्लॅमरस अदाजात दिसून आली. आपल्या ड्रेस आणि स्टाईलनं तिनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिचे फोटो प्रचंड व्हायरल झाले परंतु काही वेळातच हा ड्रेस तिच्यासाठी डोकुदुखी ठरताना दिसला. कारण करीना सारखंच आपला ड्रेस सावरत होती. आपल्या ड्रेसमुळं ती नर्व्हस होती. कारण काही प्रमाणात हे उप्स मूमेंटची शिकार होण्यासारखंच होतं. करीना झिरो फिगरसाठी ओळखली जाते.

https://www.instagram.com/p/B4_9xHFluTU/

करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर लवकरच ती गुड न्यूज या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 27 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. याशिवाय ती आमिर खानसोबतही लाल सिंह चड्ढा या सिनेमात काम करताना दिसणार आहेत. या सिनेमाची कथा टॉम हँक्सचा हॉलिवूडपट फॉरेस्ट गंपवरून घेतली आहे. दोघंही यात रोमँस करताना दिसणार आहेत. हा सिनेमा 2020 मध्ये रिलीज होणार आहे.

https://www.instagram.com/p/B4_82VyldmC/

https://www.instagram.com/p/B4_8kkUlkva/

https://www.instagram.com/p/B4_8TPjFR0P/

https://www.instagram.com/p/B4_6I_MFYPz/

https://www.instagram.com/p/B4_5sfqFjYJ/

https://www.instagram.com/p/B4W6uW9FmTv/

https://www.instagram.com/p/B3zpANAlPC_/

https://www.instagram.com/p/B3j6cNSlr-i/

 

Visit : Policenama.com