‘पहिल्यांदाच शरद पवारांना एवढं रागवलेलं पाहिलं’, पार्थच्या आत्यांनी सांगितलं

मुंबई  : पोलिसनामा ऑनलाईन : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर थेट रागवलं. यावर कोल्हापुरातील पार्थ पवार यांच्या आत्या विजया पाटील म्हणाल्या की, मी पहिल्यांदा शरद पवार यांना एवढं रागवलेलं पाहिलं आहे.

अभिनेता सुशांत सिंह रजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी पार्थ पवार यांनी केली होती. या मागणीबाबत प्रसारमाध्यमांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता त्यांनी ‘पार्थ म्यॅच्युअर नाही’. तसे त्यांच्या मागणीला काडीची किंमती नाही, असे म्हंटलं होतं. पार्थ पवार देखील राष्ट्रवादी पक्षात आहेत. तरीही पक्षाच्या विरोधात मत मांडत असल्यामुळे शरद पवार यांनी थेट प्रसारमाध्यमांसमोर त्यांना रागवले आहे. यामुळे पार्थ पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही नाराज असल्याचे समजत होतं.

पार्थ पवार यांच्या कोल्हापुरातील आत्या विजया पाटील म्हणाल्या की, शरद पवार यांना मी लहानपणापासून पाहत आहे. ते आज राजकारणातले मोठे दिग्गज आहेत. पण, त्यांना मी पहिल्यांदाच अशा कठोर भाषेत बोलताना पाहिल्यादाच पाहिलं आहे.

पार्थ हा खूप हळवा असून त्याला त्याची भूमिका मांडण्याचा पूर्ण हक्क आहे. पण, तो हे सगळं लवकरच विसरेल, असंही विजया पाटील प्रसारमाध्यमाशी बोलताना म्हणाल्या आहेत.

यावर आमदार रोहित पवार यांनी आज पहिली प्रतिक्रिया दिलीय. यावरून पवार कुटुंबात ’ऑल इज नॉट वेल,असेच चित्र आढळत आहे. हा आमच्या फॅमिलीचा विषय आहे.

’हा फॅमिली विषय असून त्यावर साहेब बोलले आहेत. आपण फॅमिली विषयावर बोलण्यापेक्षा सुशांतला न्याय मिळायला हवा, यावर भाजप राजकारण करत आहे.’ अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिलीय. पार्थ पवार यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. त्यावर भाजप राजकारण करत आहे, अशीच टीका रोहित पवार यांनी केलीय.

यावेळी कुटुंबात सुरू असलेल्या वादावर पवार साहेब बोलतील आणि निर्णय घेतील, असे म्हणत अधिक माहिती देण्यास रोहित पवार यांनी टाळाटाळ केली.

राष्ट्रवादी पक्षाच्या भूमिकेविरुद्ध मत मांडत असलेल्या पार्थ पवार यांना शरद पवारांनी खडेबोल सुनावले. सहाजिक याचा परिणाम पक्षासोबत पवार कुटुंबावरही झालाय. पण, हाच वाद आता सोडवण्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येत आहे.

अजित पवारांचे कुटुंबीय शनिवार आणि रविवारी बारामतीमध्ये एकत्र भेटणार आहे. अजित पवारांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांच्या बारामतीच्या घरी पार्थसंबंधी पवार कुटुंबियांची एकञित बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होणार? याबाबत अजित पवार नेमकी काय भूमिका घेणार? याकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे.